Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात




सी.जी.वारूडे(प्रतिनिधी-सुजान ना.)
       शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
        याबाबत सविस्तर वृत्त कलमाडी येथील माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था.संचलित अगस्तमुनी माध्य.विद्यालय कलमाडी या विद्यालयात नुकतीच नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम.यांच्या हस्ते देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन आले .
        त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेताजींबद्दल  भाषणे दिलीत नंतर विद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनींनी ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनशैलीवर मनोभाव व्यक्त केलेत. 
          शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचेआदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी देशभक्त सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबू नावाचा बोध करत बालपण,शालेयजीवन,महाविद्यालयीन प्राचार्य,व गुरूवर्य विषयीचेआदरयुक्त भाव,ब्रिटीशसाम्राज्यशाही,जालियनवालाबाग,हत्याकांड,स्वातंत्र्य,स्वदेशी,देशभक्त,आझाद हिंद सेना,आझाद हिंद प्रमुख म्हणून शपथ घेतांना सुभाषचंद्र बोस यांनी २१ऑक्टोबर १९४३रोजीचे उदगार - "ईश्वराला साक्ष ठेवून मी अशी पवित्र शपथ घेतो,की हिंदुस्थान आणि अडतीस कोटी हिंदी प्रजा यास स्वतंत्र करण्या करता मी हे स्वातंत्र्य युध्द माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालु ठेवीन". मी भारत भूमीचा सेवक राहून अडतीस कोटी हिंदीबंधुभगिनींचे हित साधणे,हेच माझे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे असे मी समजेन."तुम मुझे खून दो,मै तुम्हे आजादी दुॅगा"! या घोष वाक्यांनी क्रांतिकारक देशभक्ती विषयीचे महत्त्व पटवून दिले.तसेच अब्दुल कलाम यांचे देशाविषयी प्रेम,पर्यावरणविषयक समतोल ,शिस्तीचे महत्त्व व नवयुवक तरुणाई बंधू-भगिनी यांनी वेशनपासून दूर राहावे व आपापल्याआई-वडीलांचे स्वप्नपूर्ती पूर्ण करावेत, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सैनिकांविषयक आदरयुक्त भाव  स्वानुभवाच्यामाध्यमातून महत्त्व पटवून दिलेत. 
     यावेळीस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.यांनी केले व आभार -श्री.सी.जी.वारूडे यांनी मानले.यावेळेस कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर वृंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments