Header Ads Widget

*तखतमल मार्केटमधील साईकमल प्रोव्हीजन किराणा दुकानाला लागली आग...* *आगीत चार ते पाच लाखाचे नुकसान....* *इन्व्हर्टरच्या बँटरी शाँर्टसर्कीटने आग लागल्याचा कयास...*





*जनमत-*

*दोंडाईचा-* आज दिनांक २३ जानेवारी सोमवार रोजी संध्याकाळी स्टेशन भागातील तखतमल मार्केट मधील साईकमल प्रोव्हीजन किराणा दुकानाला आग लागुन किराणा दुकानाचे चार ते पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. यावेळी संध्याकाळी आग लागल्याची वेळ असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसुन, दोंडाईचा पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत अग्नी उपद्रवचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनास्थळी साईकमल प्रोव्हीजनचे मालक प्रितम राजपाल जयपालदास वय-३८ राहणार सिंधी काँलनी,दोंडाईचा यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज संध्याकाळी जवळपास ५.१५ वाजेच्या माझे तखतमल मार्केट मधील हाँटेल जयमल्हारच्या बाजूमधील दुकान नंबर १२ साईकमल प्रोव्हीजन ह्या किराणा दुकानाच्या पोट मजल्यावर ठेवलेल्या लुमीनँक्स कंपनीच्या इन्व्हर्टर बँटरीचा अचानक शाँर्टसर्कीटने आग लागुन बँटरी स्फोटचा आवाज होऊन मी व दुकानातील कामाला असलेला माणुस संजय मधुकर ठाकरे दोघेजन धावून वरच्या पोटमाळ्यावर गेल्यावर सर्वत्र धुरचधुर असल्यामुळे आगीचे रूप लक्षात आल्यावर आम्ही खाली आलो व पिण्याचे पाणी असलेल्या ड्रमने वरती जावून पाणीचा मारा करू लागलो.यावेळी क्षणात शेजारील दुकानदार धावून आले.त्यांनी ही खबरदारी घेत स्वतः च्या दुकानातील पाण्याचे ड्रुमने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्यामुळे मी दोंडाईचा नगरपालिकेच्या फायर फायटरला विभागाला फोन लावला. यावेळी तातडीने फायर फायटर येऊन आग आटोक्यात आली.मात्र आगीत किराणा दुकानाचे चार ते पाच लाखाचे अंदाजीत नुकसान झाले आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्थानकात खबर दिली आहे,असे सांगितले.

यावेळी घटनास्थळी माजी नगरसेवक व झुलेलाल पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष श्री रमेशदादा कुकरेजा,उपाध्यक्ष,किशोर दादा रूपचंदानी, आजी नगरसेवक कमलेशबाबा वालेचा, माजी नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदानी, विनीत मनचंदानी,सोनू वालेचा,सनी दलवानी,नंदू शर्मा, नवीन मनचंदानी, करणसिंग गिरासे,विजय रूपचंदानी, जितू बोधवानी,राम सैनानी,सुनील चैनानी,राजा छाबडीया, सतीष वालेचा,संजय राजानी,संजय मराठे,संजय वालेचा आदींनी मदत कार्य केले आहे.

Post a Comment

0 Comments