शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी , पक्षाच्यावतीने शहरात शिवसेना कार्यालय या
ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व सर्व महापुरुषांना अभिवादन करून संयुक्त बैठक घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी मध्ये आनंदमय वातावरण व तसेच सर्वांनी एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा करण्यात आला व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व फटाके वाजून युतीची घोषणा शहरात करण्यात आली व तसेच शिवाजी चौफुली या ठिकाणी पदाधिकारी व समाज बांधव कार्यकर्ते यांनी मोठा उत्साहात घोषणा देऊन फटाके फोडण्यात आले व आनंदमय उत्साह साजरा करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे
वंचित बहुजन युवक आघाडीचे राहुल पाटोळे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, भाईदास पाटील, नंदकिशोर पाटील, आर.आर.पाटील, सर्जेराव पाटील, बाबू भाई तेली, दादा न्हाळसे,सागर बोरसे,चंद्रकांत नगराळे,रोहित पाटोळे,सागर पाटोळे,पवन बैसाणे,फईम कुरेशी, भरत बोरसे,दिनेश शिरसाठ,गणेश हरी पाटोळे, सिद्धार्थ भाऊ कुवर,बबलू कापुरे,कुणाल पाटोळे,तालीब कुरेशी, सलीम कुरेशी,अन्वर कुरेशी,अजय पाटोळे,विनोद पाटोळे,चेतन पाटोळे, किरण पाटोळे ,गंपू मोहिते, सागर अहिरे, प्रवीण पाटोळे, अजय संतोष पाटोळे , प्रा.निरंजन वेंदे,आदी समाज बांधव व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या शिंदखेडा नगरपंचायत व दोंडाईचा नगरपरिषद, इतर निवडणुकांना सामोरे जावे लागत आता शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र आल्याने निश्चितच परिवर्तन घडेल असे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी सांगितले. तसेच युवा नेतृत्व राहुल पाटोळे यांनी ह्या एकत्रिकरणाची गरज होती ती आज आमचे नेते यांनी पुर्ण करुन आम्हा कार्यकर्त्यांना स्फृती दिली आहे.
0 Comments