Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धा चे उद्घाटन*




          शिंदखेडा ( यादवराव सावंत -प्रतिनिधी )--   तालुक्यातील बेटावद येथे जनता ग्रामीण क्रीडा संघटना आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या हस्ते 


करण्यात आले. प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन मान्यवरांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (एस.पी.माळी मुख्याध्यापक) होते. ह्या प्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, जिल्हा संघटक मंगेश पवार, भाईदास पाटील, माजी  तालुकाप्रमुख विश्वनाथ (लालु)पाटील, विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, सरपंच भिलाली महेंद्र गिरासे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कोळी, राजेंद्र सोनार,कपील ठाकरे, प्रशांत माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. कबड्डी स्पर्धांसाठी १९ वर्षातील साठ मुलां मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. सामने डे नाईट रंगणार आहेत. ह्यावेळी बेटावद व परिसरातील विविध खेळांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय स्तरावर नाविण्यपूर्ण खेडाळुंना सन्मानित करण्यात आले. बेटावद ही खेडाळुंची खान आहे.भविष्यात ह्या गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यां निश्चितच देशात नाव उज्ज्वल करतील.त्यासाठी जनता ग्रामीण क्रीडा मंडळ अशा पैलूंचा विचार करून विविध स्पर्धांचे आयोजन करते त्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रोत्साहन दिले जाईल असे आश्वासन जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनता ग्रामीण क्रीडा संघटनांचे सुकदेव वाडिले, संदीप पवार यांच्या सह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सुत्रसंचलन सुकदेव वाडिले यांनी केले.

Post a Comment

0 Comments