Header Ads Widget

*शिंदखेडा येथील मध्यवर्ती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*




       शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- येथील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर जयंती निमित्ताने सप्ताह विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या सह पदाधिकारीनी अभिवादन केले. ह्यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, शानाभाऊ सोनवणे, मंगेश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, विविध विचारांची शिवसेनेच्या शिवसैनिकांना दिलेल्या शिकवणीवर प्रकाशझोत टाकला.शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने दि. २३ जानेवारी ते ३० जानेवारी सप्ताहात  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रमास सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांना ही पर्वणी ठरणार आहे. प्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक मंगेश पवार, भाईदास पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले ,शहरप्रमुख संतोष देसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी तालुका समन्वयक विनायक पवार, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ( लालु) पाटील, ईश्वर पाटील दोंडाईचा, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव (छोटु पाटील), रावसाहेब सैदाणे सरपंच अक्कडसे, नंदकिशोर पाटील,आर. आर.पाटील, संदीप पवार, चंद्रसिंग ठाकुर, राजु पहाडी, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments