Header Ads Widget

*शिंदखेडा येथे रोटरी क्लब व व्यापारी असोसिएशन संयुक्त विद्यमाने बिझनेस सेमिनार संपन्न*



शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी- कोणताही व्यवसाय असो, ग्राहक आणि त्याच्या 


आवडीनिवडी हाच आपला आपल्या व्यवसायाचा केंद्रबिंदु असायला हवा, व्यवसायात स्वतःला सदैव गुंतून ठेवल्यास आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास व्यवसाय वृध्दी शक्य असते, यासाठी व्यापाऱ्यांनी नेहमी आपल्या व्यासायात ऍक्शन मोड वर असायला  हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योग सल्लागार आशिष कुलकर्णी यांनी केले. रोटरी क्लब शिंदखेडा आणि व्यापारी असोसिएशन शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती पतसंस्थेच्या शहिद डॉ.नरेंद्र दाभोलकर सभागृहात ' बिझनेस ग्रोथ सेमिनार '  चे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी क्रांतिज्योती पतसंस्थेचे संस्थापक आणि सल्लागार प्रा.सोमनाथ अहिरराव सर होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदिप गिरासे आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बोरसे हे मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते आशिष कुलकर्णी यांनी व्यापारी आणि उद्योजकांना व्यवसायवृद्धी साकारण्यासाठी नियोजन कसे करावे याची मुद्देसूद मांडणी केली. 
प्रा.सोमनाथ अहिरराव यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यापाऱ्यांनी नेहमी संधीच्या शोधात असायला हवे तसेच ग्राहकांना प्रामाणिक आणि सचोटीने  वागणूक दिल्यास ग्राहकसंख्या वाढून व्यवसायात वाढ होते असे स्पष्ट केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले. आभार ॲड. हर्षल अहिरराव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र नाईक, विनोद जैन, सुधीर शिंपी, हितेंद्र जैन, संजय पारख, गोपाल परमार,राजेंद्र तुळशीराम पाटील, मोहन राजाराम परदेशी, प्रकाश कन्हैयालाल गोधवाणी, सुनील गुलाबराव पाटील, उदय लालचंद वानखेडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील उद्योजक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या नवीन उपक्रमाबद्दल व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments