Header Ads Widget

*प्रजासत्ताक दिनी,दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललीतकूमार चंद्रे यांचा पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार...*




*करोना काळासह रूग्णालयात जनतेसाठी विविध विभाग कार्यान्वित-सुरू केलेल्या कामाची दखल...*

*ह्या अगोदरही राष्ट्रीय आरोग्य रत्न पुरस्कार...*

*जनमत-*

*दोंडाईचा-* येथील उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. ललितकुमार चन्द्रे यांचा नुकताच प्रजासत्ताक दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री मा. ना.श्री.गिरिशजी महाजन यांच्या हस्ते त्यांच्या विविध कार्याची दखल घेत, सत्कार करुन प्रशस्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा व इतर प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

डॉ. ललितकुमार चन्द्रे यांनी आजपर्यंत उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे अखंड व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत असल्याने, त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉ.ललितकुमार चन्द्रे यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासनाच्या मदतीने उपजिल्हा रूग्णालयात बंद पडलेले शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित करुन कुटुंब नियोजन,पुरुष नसबंदी व इतर शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू केल्या. येथे रुग्णांसाठी रक्त पुरवठ्याची गरज बघून त्यांनी येथील "रक्त संक्रमण केंद्र" पुन्हा पूर्ववत कार्यान्वित केले. तसेच येथे बंद असलेले क्षकिरण यंत्र, कार्यान्वित करुन नंतर आधुनिक डिजीटल क्षकिरण यंत्रही कार्यान्वित केले. दैनंदिन रुग्णांची जेवणासाठी धावपळ बघता, त्यांनी रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी "मोफत जेवण" उपलब्ध करुन दिले.तसेच,"हिंद प्रयोगशाळा" पुन्हा कार्यान्वित केली. तदनंतर आजुबाजूला रूग्णालयात घडणाऱ्या घटनांचा वेळीच खबरदारी घेत, त्यांनी संपूर्ण रुग्णालयात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले. रूग्णालयात पोलिओ, एड्स, क्षय रोग, कुष्टरोग, संबंधित व इतर सर्व, राष्ट्रीय उपक्रम पूर्णतः यशस्वी केलेत.त्यांच्याच कार्यकाळात, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा या वास्तुस "स्वच्छ्ता अभियानात, "प्रथम पारितोषिक"देखील मिळाले. त्यांची ही" सर्वोत्कृष्ट सेवा" बघूनच या अगोदर ही त्यांना सर्वोच्च मानाचा, "राष्ट्रीय आरोग्य रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच कोरोना काळात स्वतः कोरोणा बाधित होवून देखील, उपजिल्हा रुग्णालय येथे अविश्रांत व दर्जेदार सेवेसाठी त्यांना प्रजासत्ताकदिनी, सत्कार करुन प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.या दरम्यान, मा.माजी मंत्री व विद्यमान आमदार, श्री.जयकुमारजी रावल साहेब, यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहिले.या पुरस्काराबद्दल त्यांनी , देवाचे आभार मानले आणि मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.महेशराव भडांगे, डॉ.कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.स्वप्नील पाटील इतर सर्व प्रशासकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी, व प्रामुख्याने जनतेचे आभार मानले. यावेळी डॉ.ललितकुमार चन्द्रे यांनी हा "सन्मान"  माझा वैयक्तिक नसून, उपजिल्हा रुग्णालय आणि जनतेचा सन्मान आहे, असे जनमत-शी  बोलताना सांगितले, तसेच येथे असेपर्यंत, दोंडाईचा शहर व परिसरातील जनतेला,अखंड वैद्यकीय सेवा देण्याची, ग्वाहीही दिली त्यांनी आहे.

Post a Comment

0 Comments