Header Ads Widget

*शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात विविध कलागुणांना वाव*




 शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- शहरातील शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित एम एच एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 


आणि अँग्लो उर्दू हायस्कूल विभागाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी प्रतिमा व दिपप्रज्वलन करून केले. तर  संस्था अध्यक्ष स्वप्निल रमेश देसले, सचिव आनंदा चौधरी, 




संचालक प्रा प्रदीप दिक्षित, शैला रमेश देसले, खुशाल चंद्र ओसवाल, चंद्रशेखर चौधरी, आधार आबा पाटील, डॉ. एस.एन. बागुल, डॉ. एन.पी.पाटील, दिपक दादा देसले, मोतीलाल पवार, गिरीश भाई शाह, परेश देसले, डॉ इंद्रिश कुरेशी, गिरीश देसले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, गुलाब सोनवणे, एल.एन.बैसाणे, गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापक जे. पी. पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाचे  उमेश चौधरी, आर.बी.सुर्यवंशी, एस.एस.शेख यांनी जबाबदारी सांभाळत प्राचार्य टी एन पाटील, उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक के. बी.अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली मुलींना सुत्रसंचलन करण्यासाठी नम्रता माळी, दिक्षा कोळी, धनेश्वरी साळुंखे, विभुती सोनवणे यांनी केले तर माधुरी शिंदे यांनी मुख्य सुत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळली. स्नेहसंमेलनात जोगवा, कहते है हम इंडियावाले, कोई मिल गया, आमु एकलव्य ना आदिवासी नृत्य, उधळ उधळ, तेरी मिट्टी में मिल जावा , टाय टाय पिश  , आदी नृत्यासह खटीनं लगीन, गण्यानं साखरपुडा, बेरोजगार आधारित प्रबोधन नाटिका प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरले तर विविध पक्षी प्राणी चे हुबेहूब आवाज जिग्नेश माळी यांनी सादर केलेल्या अक्षरशः वेगळी छाप पाडली.तर मनस्वी स्वप्निल देसले हिच्या भन्नाट नृत्य सादर करताना प्रा.प्रदीप दिक्षित यांच्या सह अनेकांनी कौतुक केले. ह्यावेळी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयासाठी विविध माध्यमांतून संगणक मिळवून देण्यासाठी प्रा. दिपक माळी व प्रा. अजय बोरदे यांचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, उर्दू हायस्कूल युनिट सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments