सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये धुळे जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत 18 जानेवारी ते 24 जानेवारी यादरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात
आले होते. भारतामध्ये केरळ राज्य हे शिक्षणात अग्रेसर असल्यामुळे तेथील आयसीडीएस सेवांचा अभ्यास करणे, अंगणवाडीतील सेवा, सुविधा, आहार , उपलब्ध भौतिक सुविधा , इमारत बांधकाम , पूर्व शालेय शिक्षण दर्जा यांचा अभ्यास करणे या दौऱ्याचा उद्देश होता.
सदर दौऱ्यात केरळ राज्यातील अल्लपुझ्झा व इद्दुक्की या जिल्ह्यातील तसेच मुन्नार गावातील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली . या भेटीमधे अंगणवाडीतील बालके , कर्मचारी , गरोदर माता स्तनदा माता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली . प्रत्यक्षात तिथे सुकृती स्वरूपात टी एच आर दिला जात असून अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्यक्ष स्वतः सेविकामार्फत आहार शिजवून देण्यात येतो. बालकांची वजन उंची नियमित घेतली जाते. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 नुसार प्राथमिक शाळेत ज्युनिअर केजी , सीनियर केजी , पहिली व दुसरी असा आकृतीबंध राबविण्यात येत असलेल्या पायलट प्रोजेक्ट मधील शाळेलाही भेट दिली. प्रायोगिक तत्त्वावर केवळ दहा शाळांमध्ये सदर उपक्रम सुरू आहे. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शनही करून दाखविले. याचबरोबरतेथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रलाही भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. सर्व सन्माननीय सदस्यांनी तेथील कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधून आपापल्या शंकाचे निरसन केले.
उर्वरित वेळेमध्ये तेथील चहा व मसाल्याचे मळे, चहा व चॉकलेट कारखाने, हाऊस बोट, नॅशनल पार्क अशा विविध उपक्रमांना भेटी दिल्या.
सदर दौऱ्याचे आयोजन धुळे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने अध्यक्षा श्रीमती अश्विनी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस , महिला बालकल्याण सभापती श्रीमती संजीवनी सिसोदे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता . उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्या श्री हेमंतराव भदाणे यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते.
केरळ अभ्यास दौऱ्यामध्ये सभापती संजीवनी सिसोदे , माजी उपाध्यक्ष कुसुमताई निकम तसेच खालील सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य अभिलाषा पाटील , ज्योती बोरसे ,सत्यभामा मंगळे , सुधामती गांगुर्डे , वैशाली चौधरी , बेबीताई पावरा , जताबाई पावरा , अनिता पावरा , सोनी कदम , सुनिता सोनवणे , सखुबाई पारधी , शोभाबाई अलोर , सुमित्रा गांगुर्डे ,भैरवी शिरसाठ यांचा समावेश होता. सदर दौऱ्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री हेमंतराव भदाणे हे देखील सोबत होते.
0 Comments