शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- शिंदखेडा शहरातील भोईराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मॅनेजर व संचालक मंडळाच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. त्याप्रकरणी दोषींवर कारवाई देखील झाली असताना जामीन मिळवून मोकाट फिरत आहेत म्हणून ठेविदारांचे पैसे परत मिळतील अशी आशा नसताना भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या माध्यमातून पतसंस्थेच्या विरोधात जन आंदोलन सुरू केले. नेहमीच आश्वासन देत वेळकाढूपणा करीत असतांनाच २६ जानेवारी ला सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेऊन आज तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. शेवटी सर्व ठेवीदार व दिपक अहिरे यांच्या उपस्थितीत शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक रवींद्र केदार यांच्या मध्यस्थीने चेअरमन नामदेव तमखाने, प्रशासक एस डी कोकणी, सहाय्यक संतोष पाटील, कर्मचारी अशोक मोरे यांना प्रत्यक्ष पोलीस स्टेशन ला बोलवुन संबंधित ठेवीदारांचे पैसे वीस फेब्रुवारी च्या आत परत मिळतील असे आश्वासन दिले म्हणून आत्मदहन करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात येत आहे असे दिपक अहिरे यांनी सांगितले. भोईराज पतसंस्थेत एकुण ४७२ सभासद आहेत.त्यापैकी १५४ सभासदांवर कर्ज आहे.१ कोटी वर वाटप करण्यात आले असून एकूण १५७ ठेविदारांचे ९३ लाखांवर रक्कम ठेवी गुंतवून ठेवले आहे. पतसंस्थेचे मॅनेजर व संचालक मंडळाच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मॅनेजर व संचालक मंडळावर गुन्हा शिंदखेडा पोलीस स्टेशन व अर्थ विभागाकडे झाला होता. त्यानुसार मॅनेजर सुनील वाडिले यांना अटक करण्यात आली होती. तसेच संचालक विजय महाले यांनी स्वतः माझ्या कडे असलेले ६३ लाख रुपये थकबाकी मी माझ्या नावावर असलेली शेतीचा व्यवहार करुन मुदत मागून पतसंस्थेत भरणा करू असा लेखी जबाब व नोटरी करून जामिनावर सुटका करून घेतली. इतर संचालक मंडळाने ही मिळवून घेतला. ह्याच आविर्भावात मॅनेजर सह चेअरमन सह संचालक मंडळ मोकाट फिरत आहेत.आमचे काहीही होणार नाही. उलट चेअरमन नामदेव तमखाने ह्यांच्याकडे ठेविदार ठेवीबाबत जाब विचारण्यासाठी जात असताना मला पोलीस संरक्षण आहे. मला त्रास दिला तर तुमच्या वर गुन्हा दाखल केला जाईल अशी धमकी देत होते. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.. म्हणून त्रासलेले ठेविदार हवालदिल झाले. दाद मागावी कुणाकडे आमचे पैसे परत मिळतील का ? अशातच देव तारी त्याला कोण मारी.. अशीच देवरुपी व्यक्ती त्यांना गवसली. ती म्हणजे भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे नावाची नावाप्रमाणेच दिप उजळून निघाला आणि पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांना दिलासा देणारा निस्वार्थी असलेल्या दिपक अहिरे यांनी लढा सुरू केला. पतसंस्थेच्या कारभाराची माहिती गोळा करून वरीष्ठाकडे पत्रव्यवहार सुरू केला. गेल्या वर्षभरापासून सतत पाठपुरावा करीत असतांनाच केवळ आश्वासन दिले त्यानंतर कारवाई शुन्य. अखेरचा कठोर निर्णय दिपक अहिरे यांच्या माध्यमातून सर्व ठेविदारांनी २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि शासन व प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, सहकार कार्यालय, शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणारे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी सावध पवित्रा घेऊन दिपक अहिरे यांच्या सह ठेवेदार आणि चेअरमन, प्रशासक , कर्मचारी यांना एकत्र करून चर्चा घडवून आणली. त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र केदार यांची साथ लाभली. चेअरमन, प्रशासक, कर्मचारी एकमेकांवर कुरघोडी करु लागले. पतसंस्थेचे प्रशासक कर्मचारी हे पतसंस्थेत थांबत नाहीत म्हणून कर्जदार थकबाकी भरण्यासाठी तयार आहेत.पण पतसंस्था बंद असल्याने कर्जदार माघारी फिरतात असाही आरोप उपस्थित ठेविदारांनी केला. म्हणून ह्यावेळी प्रशासक एस. डी. कोकणी यांनी कर्मचारी अशोक आसाराम मोरे, मोहन भावराव मोरे, अमोल मोरे हे कामावर येत नाही म्हणून वसुली करण्यात अडचणी येतात असे सांगितले . सदर प्रशासक सह कर्मचारायांनी पुर्ण वेळ पतसंस्थेत थांबण्याची तंबी पोलीस प्रशासनाने दिली.तरी प्रामाणिक कर्जदारांनी पतसंस्थेत जावुन भरणा करून आपले खाते कर्जापासून मुक्त करावे असे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी सांगितले. असता नुकतेच बढती झालेले सहाय्यक संतोष पाटील यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारत थकबाकी वीस फेब्रुवारी च्या आत वसुली केली जाईल तसेच संचालक मंडळाच्या मोठ्या माशांवर जाळं टाकून त्यावर उपाय काय करावे ह्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील भाबड व उपनिरीक्षक रवींद्र केदार यांची साथ मला लागेल . म्हणून पोलीस प्रमुखांनी पुर्ण सहकार्य आमच्या कडून असेल पण गोरगरिब , रक्ताचे पाणी करून घाम गाळून पतसंस्थेत ठेवलेल्या रकमा परत कशा लवकरात लवकर परत मिळतील यासाठी सर्वच मेहनत करून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे ह्यावेळी सहाय्यक संतोष पाटील यांनी सांगितले. सर्व बाजूंनी सहमती दर्शविली असून सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला ह्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड व उपनिरीक्षक रवींद्र केदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान पतसंस्थेचे सहाय्यक संतोष पाटील यांनी योग्य ती कारवाई करून वसुली सुरू केले जाईल.धनादेश बाउंन्स झालेल्या वर देखील १३८ अन्वये न्यायालयात प्रकरणे वर्ग करण्यात येतील. एकंदरीत थकबाकीदारांचे लवकरच धाबे दणाणनार आहे. संचालक विजय महाले (बडा मासा) यांनी नोटरी व लेखी जबाब नोंदवून मुदतवाढ मागितली तरी त्यांच्या वरील कर्जाची परतफेड केली नाही म्हणून आठ दिवसांच्या आत त्यांच्या मालमत्तेची जप्ती वा लिलाव करण्यात येईल आवश्यक वाटल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेवु हयांच्यासह अन्य संचालक मंडळाच्या नातेसंबंधातील लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिले आहे. गेल्या महिन्यात संबंधित सर्व कर्जदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत म्हणून पुढील योग्य कार्यवाहीसाठी त्यांच्या मालमत्तेची जप्ती वा लिलाव करण्यात येईल असे प्रशासक कोकणी यांनी सांगितले. ह्या प्रसंगी ठेविदार सुनील सोनवणे, महेंद्र परदेशी, चंद्रकांत सोनवणे, देविदास शिंपी, श्रावण मराठे, परशुराम भोई, गणेश सोनवणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments