शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी --येथील
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै.शं.दे.पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य
वाणिज्य आणि कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीचे प्राचार्य डॉ. तुषार एम. पाटील यांच्या हस्ते भगवद्गीता ,ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथांचे पूजन करून महाविद्यालयाच्या पटांगणातून दिंडीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे उपप्राचार्य डॉ. व्ही.एस. पवार , उपप्राचार्य एस. टी. राऊळ , अधिक्षक श्री. राहुल( बापू )पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ.तुषार पाटील यांनी मनोगतात
मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेची परंपरा, अडीच हजार वर्षांपूर्वीची मराठी, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठी व आजच्या आधुनिक युगातील मराठीचा इतिहास उलगडून सांगितला, तसेच भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने बोलतांना बोली भाषा जिवंत राहिल तरच मराठी प्रमाणभाषा जिवंत राहील. अगोदर बोलीभाषेचे संवर्धन आपण केले पाहिजे असे प्रतिपादन केले, ग्रंथ दिंडीचे आयोजन मराठी विभागाने केले. दिंडीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments