नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला.
त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान आज पार पडले. ही निवडणूकी चुरशीची दिसून आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे काँग्रेसचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ही मतदारांशी गाठी भेठी घेवून चांगला जनसंपर्क मतदार संघात वाढवल्याचे दिसून आले आहे.
विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान झाले आहे. तर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत दोन वाजेपर्यंत विक्रमी 68.41 टक्के मतदान झाले. औरंगाबादमध्ये 58.27 टक्के मतदान झाले. अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदानासाठी गर्दी झाली. तर दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान झाले. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे.
तर नाशिक मतदारसंघ चांगलाच चर्चेत दिसून आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान धुळे जिल्ह्यात झाल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक 34.05 टक्के मतदान धुळे जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात 32.55 टक्के, नंदुरबार जिल्ह्यात 31.73 टक्के, नाशिक जिल्ह्यात 29.91 टक्के, जळगाव जिल्ह्यात 30.93 टक्के मतदान झालं आहे.
0 Comments