धुळे- येथील प्रताप मिल मधील निवृत्त मिल कामगार, गृहरक्षक (होमगार्ड) दलाचे निवृत्त जवान सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती नारायण उघडे व त्यांच्या पत्नी सौ. सरस्वती निवृत्ती उघडे या श्रमिक कुटुंबातील दांपत्याने अत्यंत प्रतिकुल हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना उच्च विद्याविभूषित करून समाज सेवेसाठी प्रवृत्त केले. या त्यांच्या उल्लेखनिय योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ, मुंबईच्या वतीने दि. 29 जानेवारी रोजी कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई येथे ‘आदर्श माता-पिता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ मुंबई या संघटनेच्या 18व्या वर्धापन दिन सोहळा, भव्य वधु-वर सुचक पालक परिचय मेळावा, पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व स्व. शिवाजीराव बापू शेंडगे पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मणराव व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके व आयकर आयुक्त मुंबई डॉ. नितीन वाघमोडे, पोस्ट टेलीग्रामचे वरिष्ठ अधिक्षक पांडुरंग चोरमले, ‘धनगर माझा’ ये संपादक धनंजय तानले, कुर्ला नागरीक सहकारी बँकेचे व्यवस्थापक शामराव आलदर, संस्थेचे कार्याध्यक्ष पांडूरंग बंडगर, सचिव मधुकर गडदे, खजिनदार चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत एका शान्दार समारंभात उघडे दाम्पत्यास हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वारकरी संप्रदायाचा वारसा असलेले निवृत्ती अण्णा उघडे यांची तिनही मुले उच्चपदस्थ कार्यरत असून शरद उघडे हे मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत, रविंद्र उघडे हे सोमय्या कॉलेज, घाटकोपर येथे प्राध्यापक असून मोठे सुपुत्र रमेश उघडे हे धुळे पोलीस दलात कार्यरत आहेत.विशेष म्हणजे तिनही मुलांचे शिक्षण धुळे नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधून झालेले आहे. उघडे दांपत्यांचे योग्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
0 Comments