नंदूरबार- येथील मराठा पाटील समाज मंडळाचे शाहीर हरीभाऊ मराठा पाटील नूतन मंगल कार्यालयाचे नामकरण व उद्घाटन समारंभ आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा मा. ना. डॉ. विजयकुमार गावीत साहेब यांच्या शुभहस्ते, माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांचे अध्यक्षतेखाली, नंदूरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिनाताई गावीत, माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, उद्योगपती डॉ. रविंद्रबापू चौधरी, देणगीदार दानशूर श्रीमती उषाताई हरिभाऊ पाटील, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एन. मराठे, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. दिपक अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 5 फेब्रुवारी रविवार रोजी दुपार चार वाजता शाहीर हरीभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय, तैयबी नगर, ज्ञानदिप सोसायटी, धुळे रोड, नंदुरबार येथे होणार आहे. या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त मराठा पाटील समाज नंदूरबारचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
0 Comments