Header Ads Widget

*शिंदखेडा एव्हरशाईन इंग्लिश स्कूल येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - आमदार जयकुमार रावल यांनी केले उद्घाटन*




  शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या एव्हरशाईन इंग्लिश स्कूल वतीने आयोजित बिजासनी मंगल कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ह्यावेळी माजी सभापती प्रा सुरेश देसले, माजी नगराध्यक्ष दिपक देसले,सुनील चौधरी, जिल्हा परिषद सदस्य निरज धनाजी अहिरे, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, जोमन जोग, सरपंच गिरीश देसले, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, शहराध्यक्ष प्रवीण माळी, प्रा. प्रदीप दिक्षित, चेअरमन शहाजी वर्गीस, सुयोग भदाणे, उल्हास देशमुख, सुरज देसले, अँड प्रशांत जाधव, विजय पाटील, विजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ह्यावेळी अवार्ड ग्लोबल एज्युकेशन नेशनल दिल्ली येथे सन्मानित रिना शहाजी यांचा विशेष सत्कार आमदार जयकुमार रावल यांनी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेअरमन शहाजी वर्गीस, रिना शहाजी,  मिना पाटील, उज्वला बासिंगे , कल्याणी चित्ते, टिना वाधवा, शाहीन वर्गीस, माया देसले, शरद ठाकुर, संदीप देसले, माया राजेश, आदित्या राजेश, निलीमा पाटील, अनिता माळी, आरिफ पिंजारी, संध्या भामरे यांनी परिश्रम घेतले. तर शारोन शहाजी, मिना पाटील, वाहिद अन्सारी यांनी सुत्रसंचलन केले.

Post a Comment

0 Comments