Header Ads Widget

दोंडाईचा *फाटक बंद च नाटक कधी थांबणार ?




दोंडाईचा शहरात रेल्वे गेट नंबर 103 कमला आॅईल मिल जुना शहादा रोड जवळ असलेले रेल्वे गेट अर्थात रेल्वे फाटक गेल्या पाच ते सहा दिवसापासून बंद आहे.कारण रेल्वे पट्टयाचे काम सुरु होणार? असे सांगितले जात असले तरी आजपर्यंत काम सुरु झाले नाही.वास्तविक पाहता रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचे नियोजन असावे. म्हणून टेक भिल्लीटी भोगावती नदी रेल्वे पुला खालुन एक किलोमीटर फिरुन जावे लागणार यापुर्वी रेल्वे पट्टयाचे काम सुरु होते.त्यावेळी यांच रस्त्याचा वापर केला होता. आता पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर गेट बंद झाले असले तरी भविष्यात हे गेट कायमचे बंद होईल? पर्यायी रस्ता खुप अडचणीचा आहे.परंतु लोकांचा रोष किती? त्यावर विचार होईल.गेल्या चार वर्षापूर्वी आमदार जयकुमार रावल मंत्री असतांना शहरात दोन रेल्वे उड्डाण पूल मंजूर करुन त्यांचे भूमीपूजन झाले होते.त्यातुन बाम्हणे रोड उड्डाण पुलाचे काम प्रगती पथावर आहे.तर दुसरा जुना शहादा रोड रेल्वे उड्डाण पूल रद्द झाल्याची चर्चा आहे. कदाचित रद्द झाला असावा कारण गेल्या चार वर्षात बाम्हणे रोड रेल्वे उड्डाण पुलाचे काम ६० टक्के पुर्ण झाले तर शहादा रोड रेल्वे उड्डाण पूलाचे फक्त दोन बिंब अर्धवट उभे आहेत.त्यानंतर उड्डाण पूलाचे काम बंद झाले.रेल्वे उड्डाण पूल झाला तर राजपथ रस्त्याचे सौदर्य संपुष्टात येईल असे कारण सांगण्यात आले तरी मुख्य कारण वेगळे असु शकते रेल्वे उड्डाण पूल मंजूर कुणी केला व काम रद्द का? करावे लागले हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे.रेल्वे उड्डाण पूल हा दोन्ही बाजूंना एक किलोमीटर लांबीचा असतो.पुल मंजूर करतांना प्लाॅन आणि खर्च दाखवावा लागतो.त्यानंतर तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाने काम मंजूर करतात एक किलोमीटर अंतर म्हणजे डि.आर.बी.ओ. डी.हायस्कूल पासून पुल उभा झाला असता.त्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,डॉ. देशमुख नानाचे घर,अप्पर तहसील कार्यालय संरक्षण भिंत,राजपथ रस्ता आणि गर्स हायस्कूलचा काही भाग पुलामुळे तोडावा लागला असता.त्यानंतर उर्वरित भाग पुलाखाली दाबला गेला असता.त्यामुळे मुख्य शो खराब झाला असता व नागरीकांना पुलावर जाण्यासाठी फिरुन जावे लागले असते या सर्व अडचणीचा विचार करुन कदाचित उड्डाण पूल रद्द करण्यात आला असावा.परंतु उड्डाण पूल रद्द करण्याची प्रक्रिया खुप उशिरा झाली पुल मंजूर झाला.ट्रेडर प्रकिया पुर्ण झाली काम सुरु झाले.दोन बिंब अर्धवट झाल्यावर आठवण येते.कि हा उड्डाण पुल झाला तर समस्या निर्माण होतील. त्यामुळे पुल रद्द झाला तरी लोकांची गैरसोय होणार आहे. ती गैरसोय होऊ नये म्हणून भुयारी मार्ग करता येईल हा भुयारी मार्ग राजपथ रस्ता पासून करता येईल परंतु तशी हालचाल दिसत नाही.म्हणून भुयारी मार्ग होणार का? नाही यात शंका आहे.हे दोन्ही पर्याय बंद झाले तर एकच पर्याय आहे.तो म्हणजे टेक भिल्लीटी भोगावती नदीच्या रेल्वे पुला खालुन जाने हा पर्याय व रस्ता व्यापारी लोकांना वापरण्या योग्य नाही.कारण हा रेल्वे पुल गावाच्या शेवटी सामसूम ठिकाणी आहे.त्याठिकाणी मेलेल्या जनावरांचे हाडे,मास आणि दुर्गंधीचा वास येतो.जुना शहादा रोड कडे सिंधी काॅलणी आहे.या सिंधी बांधवाचे व्यावसायिक दुकाने मुख्य स्टेशन भागात आहेत. दिवसभर व्यवसाय करुन रात्री या रेल्वे पुला खालुन घरी जाणे धोकादायक आहे.त्यात रात्रीचे अंधार आणि शहर चोरी साठी प्रसिद्ध आहे.म्हणून दोन्ही बाजूंनी व्यापार्याची कोंडी होणार? रेल्वे उड्डाण पूल झाला तरी एक किलोमीटर फिरुन जावेच लागणार? आणि नाही झाला तरी एक किलोमीटर चा फेरा आहे.हा फेरा वाचवायचा असेल तर भुयारी मार्ग हा एकमेव पर्याय आहे.परंतु रेल्वे प्रशासन हा मार्ग करणार का? कारण अंतर कमी खर्च कमी त्यात नगरपरिषदेची बाजू म्हत्वाची आहे.नगरपरिषद प्रशासन व रेल्वे प्रशासनाने समन्वयाने प्रयत्न केले तर अशक्य नाही.त्यामुळे नागरिकांना सुरक्षित रस्ता सह सुविधा देता येतील यासाठी लोकांचा लोकसहभाग किती? म्हत्वाचा आहे.त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व भाजपाने करावे.कारण दोन दिवसांपूर्वी शहर अध्यक्ष यांनी प्रसिद्धी माध्यम साठी का? असे ना? निवेदन दिले.गेट बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्ग द्या परंतु पर्यायी मार्ग नाही दिला तरी चालेल पण भुयारी मार्ग द्या अशी मागणी लोकांनी केली तर त्याला भाजपाने पाठिंबा द्यावा त्यामुळे भाजपाला जनमताचा आधार मिळेल.....
✍️✍️✍️अहिल्या न्युज मिडीया*

Post a Comment

0 Comments