Header Ads Widget

*शिंदखेडा येथील साहित्यिक व कवी यादवराव सावंत यांची गोवा येथे पहिले राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनासाठी निवड*




                           शिंदखेडा ( प्रतिनिधी)-- शहरातील बी के देसले नगर रहिवासी असलेले साहित्यिक व कवी यादवराव सावंत यांची पहिले राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनासाठी निवड झाल्याचे निवड पत्र अध्यक्ष डॉ. आनंदा अहिरे यांनी पाठविले आहे. सदरील देशातील महा प्रवासी कवी संमेलन गोवा येथे तीन ते पाच फेब्रुवारीला होणार आहे. यादवराव सावंत यांनी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात एक अनोखी छाप पाडली आहे. त्याचबरोबर ते उत्कृष्ट साहित्यिक व कवी म्हणून देखील ओळखले जातात. त्यांना साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल शंभर हुन अधिक मुंबई, हैदराबाद, दिल्ली, या देशातील प्रमुख शहरासह विविध ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. अत्याचार हे तीन अंकी नाटक तत्कालीन शिक्षणमंत्री सुधीर जोशी ह्यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले आहे. जवळपास दोनशे हुन अधिक कविता स्वरचित असुन भविष्यात लवकरच कविता संग्रह प्रकाशित होणार आहे. अनेक कथा देखील असुन कुंकू आणि माझा महाराष्ट्र कथासंग्रह प्रकाशित होणार आहे. विशेष म्हणजे देशभरातील फक्त पन्नास कवींची निवड करण्यात आली असून त्यात शिंदखेडा येथील यादवराव सावंत यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments