काल नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली.नाशिक विभाग मतदारसंघात पाच जिल्हे येतात.धुळे, नंदुरबार, जळगाव,नाशिक,आणि नगर या जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात उमेदवारी देण्यावरुन सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या त्यामुळे हि निवडणूक अत्यंत चुरशीची होणार? अशी परिस्थिती असतांना मतदान खुपच कमी झाले.कमी झालेल्या मतदानामुळे कुणाचे नुकसान होते.ते उद्या समजेल परंतु पदवीधर मतदारसंघ म्हणजे उच्च शिक्षित मतदार असतात त्यांच्या हक्काच्या मतदानातून समस्या व महत्त्वाचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात त्यामुळे मतदानाचा अधिकार महत्त्वाचा आहे.त्या अधिकाराचा वापर करुन हक्काचा आमदार निवडून देण्याची जबाबदारी असते. किंवा हुशार नागरिक म्हणजे पदवीधर मतदार असतात. नाशिक विभागात सरासरी ५० टक्के इतके मतदान झाले. म्हणजे मतदार यादीच्या निमी मतदान होत असेल तर अशिक्षित लोकांकडून काय? अपेक्षा ठेवणार? जेव्हा - जेव्हा देशात व राज्यात मतदान होतात.तेव्हा -तेव्हा ७० टक्के पर्यंत मतदान होतात. त्यामानाने पदवीधरांची टक्केवारी जास्त पाहिजे होती. पण तसे झाले नाही.उलट सुशिक्षित असुन टक्केवारी कमी झाली.मतदानाची घटती टक्केवारी हा चिंतेचा विषय आहे.परंतु पदवीधर अर्थात उच्च शिक्षित मतदार जर आपला मतदानाचा हक्क बजावत नसतील तर काय? फायदा उच्च शिक्षित होण्याचा अशिक्षित मतदारांचे मतदान कमी झाले तर समजु शकतात परंतु पदवीधर मतदार हा सुशिक्षित मतदार असुन मतदान कमी करणे हा चिंतेचा विषय आहे.....
0 Comments