Header Ads Widget

कलमाडी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा






सी.जी.वारूडे(प्रतिनिधी-सुजान ना.)
      शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेत.
  १]अगस्तमुनीमाध्य.विद्यालयात-
    संस्थेचे संस्थापकअध्यक्षआदरणीय 
    आबासो.जे.बी.पाटील यांच्या हस्ते
     ध्वजारोहण करण्यात आले.
२]ग्रामपंचायत-लोकनियुक्त सरपंच 
    ताईसो..श्रीमती गोजरबाई पुंजू
     माळचे यांच्या हस्ते ध्वजारोहण
    करण्यात आले.व ध्वजस्तंभाची
   पूजा उपसरपंच श्री सोनूभाऊ 
   विजेंद्र छबिलाल झालसे यांच्या 
   हस्ते करण्यात आले.
३]विविध कार्यकारी सोसायटीत 
    चेअरमन श्री किरण विजय झालसे
     यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
     आले.
       यानंतर ज्ञान मंदिर चौकात सांस्कृतिक कार्यक्रमात त्यात अंगणवाडी,प्राथमिक केंद्र शाळा व अगस्तमुनी माध्य विद्यालय इ.च्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाषणे,देशभक्तीपर गीते,डान्स,भजन वगैर कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी होते तर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ताईसो श्रीमती गोजरबाई पुंजू माळचे 
  माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-आबासो. श्री.जे.बी.पाटील, स्थानिक समितीचे अध्यक्ष  श्री पी.जे.पाटीलसर संचालक - श्री.रमेश पुंडलिक कदम, सर्व सन्मानिय ग्रामपंचायत सदस्य,सदस्या. केंद्र प्रमुख-श्री आर जी राजपूत विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासो.
श्री.एस.ए.कदम व गावातील श्रेष्ठ मंडळी सैनिक पिता,.आदि मान्यवर उपस्थित होते.
        यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी प्रजासत्ताक दिन विषयीचे महत्त्व,जिल्हा सी ओ मॅडम यांच्या संकल्पना  
 १] बालविवाह थांबवणे.
२]शाळाबाह्य स्थंलातरीत मुलामुलींना 
    शाळेत दाखल करुन घेणे.
 ३]कृष्ठरोग निमृलन करणे इत्यादी.व 
        शासनामार्फत मिळणार्‍या लाभांश,गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव,खेळाडूचे तालुका, जिल्हास्तरीय पर्यंत खेळकौशल्य वर्णन,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र,शैक्षणिक साहित्य व बक्षीस देणाऱ्या दात्यांविषयीचे मनोभाव व्यक्त केलेत. 
         यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक -आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी केले तर सुत्रसंचालन-श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार-श्री.पी.आर पाटील यांनी मानले व या राष्ट्रीय कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,पालकवर्ग,ग्रामस्थ मंडळी,विविध शाखेतील अधिकारी पदाधिकारी,अंगणवाडी ,प्रा.केंद्र शाळा व माध्य.विद्यालय-शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments