Header Ads Widget

स्वत:ला दिव्यांग आहोत असे न समजता स्वत:तील भव्य दिव्य ओळखा दिव्यांग असूनही विश्वाचे रहस्य शोधणारा स्टिफन्स डोळ्यासमोर ठेवा प्रजासत्ताक दिनी यमुनाई शिक्षण संस्थेत डॉ. यतीन वाघ यांचे प्रतिपादन




धुळे- ‘‘खगोल शास्त्रज्ञ स्टिफन्स हे दिव्यांग होते. पण त्यांनी हार न मानता विश्वाचे रहस्य शोधून काढले. तसेच तुम्हीही खचून न जाता दिव्य सर्वात असते ते तुमच्यातही आहे ते ओळखा, जग तुमचे आहे, मी तुमच्या कुटुंबाचाच आहे, मला भाऊ समजा’’ असे प्रतिपादन खान्देशातील नामवंत हार्ट सर्जन डॉ. यतीन वाघ यांनी येथील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्री संस्कार मतीमंद मुलींचे बालगृहात 74व्या भारतीय प्रजसत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना केले. ख्यातनाम हार्ट सर्जन डॉ. यतीन वाघ मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, वाघ परिवार व येथील शिक्षकवृंद या अनाथ मतिमंद मुलींसाठी करीत असलेले कार्य व शाळा परिसरातील वातावरण पाहून मी अतिशय भारावून गेलो आहे. या संस्थेने मला आपल्या कुटुंबाचा एक भाग समजावा, इथे मला दिव्यांग मुलींमध्ये देव व संस्थाचालक, शिक्षकवृंदांमध्ये देवासारखी माणसे दिसत आहेत. आपल्या कार्यात मी देखील खारीचा वाटा उचलीन. या मुलींच्या वैद्यकीय सेवेसाठी कधीही बोलवा मी स्वत: तपासणी करून उपचार करेल असे जाहीर केले. 
यावेळी यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत माता बालसंगोपन योजनेतून अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी चि. तन्मय भिकन चौधरी यास तो वयाचा 18 वर्ष होईपर्यंत दरमहा अकराशे रुपये मंजुर करण्यात आले असून आज त्यास मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे मुख्य मार्गदर्शक सुनिलबापू वाघ यांनी मान्यवरांना संस्थेचा परिचय करून देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी बालगृहातील मुलींनी आपल्यातील सुप्त गुणांचे प्रदर्शन करीत सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम नृत्य सादर केले. ध्वजारोहण समारंभ प्रसंगी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सुनिलभाऊ वाघ, सचिव मनिषाताई वाघ, भरतभाऊ वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गो. पि. लांडगे, युवराज मनोरे, नामदेव पवार, अधिक्षिका दिपश्री पवार, अजय मोरे, किसन धिवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. देवयानी निळे व आभार ललित सुर्यवंशी यांनी मानले. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सोबतच परिसरातील नागरीकही समारंभास उपस्थित होते. दिपाली खराटे, पुनम वाघ, रोहित मोरे आदींनी परिश्रम घेतले.  


Post a Comment

0 Comments