जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी शिंदखेडा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री डॉ.सी के पाटील, विस्तारअधिकारी श्री सी.एस.खर्डे प्राचार्या श्रीमती एम डी बोरसे उपशिक्षक श्री डी एच सोनवणे,श्री ए टी पाटील श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री आर पी वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उद्बोधन पर भाषणाचा डॉ. सी के पाटील यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्न स्वरूपात चर्चा करून गोषवारा घेतला तसेच जीवनात शॉर्टकट वापरू नये स्वतःचे सामर्थ्य ओळखावे व जीवनात यश प्राप्त करावे या मोदींच्या भाषणातील वाक्य विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन समजून सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जे डी बोरसे श्री हरीश मोरे श्री सी.व्ही.पाटील श्री मनीष माळी यांनी सहकार्य केले.
0 Comments