धुळे- देशाचे नेते खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा आणि हात से हात जोडो अभियान हे देशाच्या एकात्मतेसाठी राबविलेली चळवळ आहे.जातीभेद विसरुन
माणसाला माणूस जोडण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी केले. दि.26 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने धुळ्यातील वलवाडी-भोकर येथे हात से हात जोडो अभियानाला आ.पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. या अभियानाला पहिल्याच दिवशी नागरीकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार दि.26 जानेवारी 2023 पासून हात से हात जोडो अभियानाला प्रारंभ झाला. भारत जोडो यात्रेचा विस्तारीत कार्यक्रम म्हणून हात से हात जोडो अभियान राबविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. त्या अनुषंगाने दि.26 जानेवारी रोजी धुळ्यातील वलवाडी-भोकर येथे या अभियानाला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी खा.राहूल गांधी यांनी देशवासियांना लिहीलेले पत्र आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. हात से हात जोडू या कार्यक्रमाचे प्रस्ताविक धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे यांनी केले व धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी यावेळी सांगितले की हात से हात जोडो या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गाव पातळीवर काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील संदेश पोहोचणार आहे तसेच भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी जे जे जे आश्वासने दिली होती त्या भ्रष्ट जुमला पार्टीची एक पुस्तिकाही वाटप करण्यात येईल असे त्यांनी सांगितले .त्यानंतर आ.कुणाल पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांसह वलवाडी तसेच भोकर येथील व्यावसायिक,दुकानदार, रस्त्याने ये-जा करणारे प्रवाशी,वाहनधारक तसेच घराघरात हे पत्रक वाटण्यात आले.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी आ.कुणाल पाटील यांच्यासोबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर,शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे,
ज्येष्ठ नेते साबीर खान, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, महिला काँगे्रस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, माजी सरपंच भटू चौधरी,माजी पं.स.सदस्य छोटूभाऊ चौधरी, माजी नगरसेवक मुझफ्फर हुसैन, युवक काँग्रेसचे आबा पाटील,विमलताई बेडसे,जि.प.सदस्य अरुण पाटील,अशोक आबा पाटील, राजेंद्र भदाणे, उपसरंपच हिरामण पाटील, किरण नगराळे,इम्तियाज पठाण, आयुब खाटीक, मुकेश खरात,वाल्मिक वाघ, जगदिश चव्हाण,बापूजी वाघ,प्रविण पाटील,अरुण धुमाळ,सुमित काळे, अनिल चित्ते,हरिभाऊ अजळकर, राजेंद्र खैरनार,किरण भामरे,दिपक पाटील,हरिभाऊ चौधरी,रजिया सुलतान, हसन पठाण,अॅड.सुधीर जाधव, एम.एस.पाटील,भावना गिरासे,भिवसन अहिरे आदी उपस्थित होते.
0 Comments