Header Ads Widget

*जि. प. शाळा वारूड येथे प्रजासत्ताक दिन साजरा*




     जिल्हा परिषद शाळा वारूड  या गावी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.मा. लोकनियुक्त सरपंच मा. सौ.शोभाबाई घनश्याम बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश गंगाराम पाटील यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच मा. अनिल मधुकर चौधरी  तथा ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पदाधिकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शाळा क्रमांक 1व 2 चे शिक्षकवर्ग गुलाबराव पंडित सोनवणे मुख्याध्यापक,सुरेश गंगाराम पाटील मुख्याध्यापक, तसेच शिक्षिका वंदना गोकुळ पाटील,पल्लवी यशवंतराव बागुल, अश्विनी दिलीप भामरे,मनीषा पंडित बोरसे,अर्चना भैय्यासाहेब शिंदे,सुरेखा श्रावण ठाकरे उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजना नरडाणा महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर वारूळ या गावी सुरु आहे त्या निमित्ताने कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. जी. सोनवणे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे तसेच महाविद्यालयाचे मुक्कामी असणारे विद्यार्थी यांचा देखील सहभाग होता. ध्वजारोहन झाल्यानंतर शाळेतील चिमुकल्या विविध विद्यार्थी मित्रांनी आपले भाषण हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतून दिले. त्यांचे भाषण प्रशंसा करण्याजोगे होते, व काही मुलं, मुलींनी देशभक्तीपर गीत गायन केले. बेटी बचाव, बेटी पढाव यावर छोटी नाटिका सादर करण्यात आली.त्यांना प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद मिळाला. ह्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाने प्रचंड मेहनत घेतलेली दिसली कार्यक्रम खूप उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments