शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी --
येथील २६ जानेवारी २०२३ गणराज्य दिवस म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो कारण ब्रिटिश साम्राज्या नंतर भारत देशाने संविधान स्विकारले होते .भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष झाले परंतु शेतकऱ्यांनच्या समस्या जशाच्या तशाच प्रलंबित असल्यामुळे
शेतकरी व सर्वसामान्य जनतेवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध पेटून उठणारे शानाभाऊ सोनवणे हे नेहमी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने म्हणजे महिलांचा सन्मान, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान व गोरगरिबांना भेटवस्तू अशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत असतात यावेळेस शिंदखेडा तालुक्यातील व मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आमरण उपोषण करण्यासाठी स्वतः शानाभाऊ सोनवणे बौलगाडी हाकत शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला अनोख्या पद्धतीने सुरुवात केली आंदोलनाच्या मागण्या शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करुन बॅंक व विज वितरण कंपनीने सक्तीची वसुली थांबवावी, शेतकऱ्यांच्या मालाला खर्चाच्या दिडपट हमी भावासोबत स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसाला १८ तास विज पुरवठा करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये घोषणा केली होती की शेतकऱ्यांचे उत्पन्नाला २०२२ पर्यंत दुप्पट भाव करणार त्या संदर्भात उपाय योजना करुन उत्पादन दुपटीने वाढवावे, शिंदखेडा मतदार संघाचा पोकरा योजनेत समाविष्ट करावे, कापसाची आयात परदेशातुन करु नये, कापसाला १२ हजार रुपये हमीभाव द्यावा, पिक विमा योजनेचा लाभ देतांना महसूल मंडळ हा निकष न लागता वैयक्तिक शेतकरी निकष लावावा, अनेक राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना कर्ज देताना अडचणी निर्माण करतात म्हणून लक्षांक नुसार कर्ज वितरित होत नाही त्याची सरकारने तात्काळ दखल घेऊन कर्ज वितरित करावे असे अनेक मागण्यासाठी आज २६ जानेवारी २०२३ रोजी गणराज्य दिवस व शानाभाऊ सोनवणे यांचा वाढदिवस रोजी बैलगाडी वर बसुन तहसील कार्यालय पर्यंत आले व बैलगाडी वर बसुन बेमुदत आमरण उपोषणाला शानाभाऊ सोनवणे सोबत रावसाहेब ईशी तहसील कार्यालयासमोर ८ :०० वाजे पासुन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाला बसले त्यावेळी तहसीलदार आशा गांगुर्डे , नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, प्रशांत गोरावडे, रवींद्र केदार, मिलिंद पवार यांनी भेट देऊन चर्चा केली त्यावेळी दिपक देसले, सुनील चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, मंगेश पवार, भाईदास पाटील, छोटु पाटील, डॉ इंद्रिश कुरेशी, प्रकाश चौधरी, विनायक पवार, प्रा. प्रदीप दिक्षित, सर्जैराव पाटील, प्रा.निरंजन वेदें, विश्वनाथ पाटील, इंदास पाटील, आबा मुंडे, दादाभाऊ पाटील, विष्णू चव्हाण,रविंद्र मोहने, रावसाहेब सैदाणे ,कुणाल माळी, दिनेश चव्हाण,सागर देसले, नंदकिशोर पाटील, संजय मगरे, मुकेश ईशी, कुणाल पाटील,गौतम कोळी भुषण सोनवणे , रोशन सोनवणे सह अनेक कार्यकर्ते नी उपोषण ठिक भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. जोपर्यंत शासन व प्रशासन संबंधित वरीष्ठ अधिकारी ठोस निर्णय व आश्वासन देत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा निर्णय कायम राहील असे उपोषण कर्ते शानाभाऊ सोनवणे व रावसाहेब कोळी यांनी सांगितले.
0 Comments