Header Ads Widget

शिंदखेडा जनता हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा*



*जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव व 


विद्यमान आरोग्य सभापती श्रीमती मीरा मनोहर पाटील खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे माजी मुख्याध्यापक बी बी मराठे श्री के आर पाटील शिक्षकेतर कर्मचारी श्री बालमुकुंद सत्तळीस प्राचार्या श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक उमेश देसले वरिष्ठ लिपिक श्री किशोर पाटील आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर स्वस्तिक तयार करून दाखविले तसेच डंबेल्स घुंगरू काठी व मुग्दल यावर आधारित विद्यार्थ्यांनी कवायतचे हात सादर केले तसेच विविध शालेय स्तरावरील स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते व त्यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.                         
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री डी के सोनवणे श्री जे डी बोरसे श्री एस के जाधव श्रीमती एन जे देसले श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती पि यू पवार व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments