Header Ads Widget

*शिंदखेडा येथे दिपक दादा देसले मित्र परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनी आजी माजी सैनिकांचा गौरव*





     शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- येथील शिवाजी चौकात दिपक दादा देसले मित्र परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विरमाता सह आजी माजी सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक प्रकाश जोशी होते. सुरुवातीला देशमाता प्रतिमेला पुष्पहार विरमाता भिमाबाई अहिरे सह मान्यवरांनी केले. माजी सभापती प्रा. सुरेश देसले, माजी नगराध्यक्ष दिपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दिपक अहिरे, दिनेश माळी, सुमित जैन, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, खानदेश रक्षक ग्रुप चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, कृष्णकांत परदेशी, गोटु आप्पा ठाकुर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना समन्वयक विनायक पवार, पंकज देसले, परिक्षीत देशमुख, अँड. निलेश देसले, पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन विजय नाना चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. ह्यावेळी शिंदखेडा शहरातील व तालुक्यातील आजी माजी सैनिकांत विरमाता भिमाबाई अहिरे, ज्ञानेश्वर गिरासे, प्रल्हाद देवरे, भुषण पवार, भाऊ सिंग गिरासे, नंदलाल साळुंखे, संजीव नगराळे, प्रमोद गुरव, नितीन मिस्तरी, शांताराम जाधव, चंद्रकांत देसले, आदींसह सर्वच सैनिकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ तिरंगा ध्वज चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी आजच्या दिवसाला ज्या सैनिकांनी भारतीय सिमेवर देशसेवा करुन आपल्याऔ जीवाचे रान करून सहिसलामत परत आले. म्हणून अशा वीर जवानांना सलाम करत त्यांचा सहह्दय सन्मान दिपक दादा मित्र परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त केला आजच्या तरुणाईला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे दिपक देसले यांनी सांगितले. सुत्रसंचलन अँड निलेश देसले, परिक्षीत देशमुख यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments