शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित गर्ल्स हायस्कूल येथे ध्वजारोहण उपाध्यक्ष हसनभाई बोहरी यांच्या हस्ते करण्यात आले. तर एम एच एस एस महाविद्यालयाचे ध्वजारोहण जेष्ठ संचालक डॉ. एस.एन.बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी अध्यक्ष स्वप्निल रमेश देसले, सचिव आनंदा चौधरी, संचालक प्रा प्रदीप दिक्षित, डॉ. एन. पी.पाटील, दिपक देसले, आधार आबा पाटील, मोतीलाल पवार, चंद्रशेखर चौधरी, गिरीश भाई शाह, गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापक जे.पी.पाटील, पर्यवेक्षक के.के.चौधरी, एम एच एस एस महाविद्यालयाचे प्राचार्य टी एन पाटील, उर्दू हायस्कूल चे के.बी.अहिरराव सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या वतीने लेझीम पथकाने संचलन केले.तर गर्ल्स हायस्कूल येथे देशभक्ती पर गीते तर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. विशेष म्हणजे मुख्याध्यापक जे.पी.पाटील यांचा आज वाढदिवसानिमित्त संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन जयश्री पवार केले. शिक्षक व शिक्षीका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments