शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- येथील नगरपंचायत ची पंचवार्षिक निवडणुकीत निवडुन आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे सह सर्व नगरसेवक यांचा कालावधी ३१ जानेवारी ला संपला होता त्या पाश्र्वभूमीवर नगरपंचायत सभागृहात निरोप समारंभ सोहळा संपन्न झाला त्यावेळी कोणाला प्रशासक म्हणून नियुक्ती पत्र दिले जाईल असे सुतोवाच असतांनाच अनुभव असलेले आमचे शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत यांनी त्याच वेळी सर्वांसमोर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांची निवड होणार असे भाकीत केले होते अखेर त्यांची नियुक्ती पत्र नगरविकास विभागाच्या उपसचिव प्राजक्ता कुलकर्णी यांनी देवुन शिंदखेडा नगरपंचायत चे कर्तव्य दक्ष नेहमीच हसमुख असणारे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांची प्रशासक म्हणून कार्यभार दिला आहे. आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडली जाईल शिंदखेडा शहरातील काही प्रमाणात राहिलेले विकासात्मक कामे व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे नवनिर्वाचित प्रशासक बिडगर यांनी यावेळी सांगितले.
0 Comments