Header Ads Widget

*दोंडाईचातील रमाई आवास घरकूल योजनेत मंजूर घरकुलांसाठी निधीची तरतूद करा...* *मुत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत समावेश करावा-सामाजीक कार्यकर्ते कुष्णा नगराळे यांची मागणी...*




*जनमत-*

*दोंडाईचा-* दिनांक ३१ जानेवारी रोजी दोंडाईचा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील लाभार्थ्यांनी घरकुल योजने अंतर्गत मंजूर घरकुलांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेच्या सहाय्यक आयुक्त शिल्पा नाईक यांना निवेदनातून केली आहे.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, येथील रमाई घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झालेल्या ७२ लाभार्थ्यांसाठी अद्यापही दोंडाईचा नगरपरिषदेला निधी प्राप्त झाला नसल्याने हे सर्व लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्वरित निधीची तरतूद करावी, अशा मागणीचे निवेदन दोंडाईचा येथील लाभार्थ्यांनी दिले आहे. तसेच दोंडाईचा नगर पालिकेत रोजंदारीने काम करणाऱ्या १०३ सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे. मात्र त्यात काही सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. मात्र अटी शर्ती अभावी त्यांच्या वारसांना न्याय हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.म्हणून निस्वार्थी पणे आपली  सेवा बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना कायम सेवेत रुजू करावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा नगराळे, दिलीप माणिक, महेश नगराळे, भैय्या नगराळे, रोहित नगराळे, कैलास पवार, प्रकाश नगराळे, भैय्या रामराजे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. ‌

Post a Comment

0 Comments