दोंडाईचा-- शहरात राऊळनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी नविन आणि जुनी अशी दोन पाईप लाईन आहेत.२१ कोटींची नविन फिल्टर पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन सुरु झाली नसली तरी जुन्या पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.राऊळ नगर चुडाने रोड लगत सालदारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनच्या वाॅल फिरवण्याचा खड्डा आहे. त्या खड्डयात पाईप लाईन चा वाॅल आहे आणि शेजारीच घाण पाण्याची गटार आहे.वाॅल आणि गटार शेजारी - शेजारी का? आहे. असा प्रश्न लोकांना पडतो.वाॅल आणि गटारीच नातं काय? वाॅल असला तरी वाॅल च्या खड्याला संरक्षण बांधकाम नाही.ज्यावेळी वाॅल खोलतात अर्थात नळाला पाणी सोडतात त्यावेळी वाॅल च्या पाण्याने तो खड्डा फुल भरतो. व नळांना पाणी येत असल्यामुळे गटार ही फुल भरते गटार मध्ये कचरा गोळा झाल्यावर गटारीचे पाणी वाॅल च्या खड्डयात आणि वाॅल चे पाणी गटारीत असा प्रकार सुरु आहे.वाॅल खोलणारा बंद करायला येतो तेव्हा वाॅल सापडत नाही.यामुळे राऊळ नगर चुडाने रोड परिसरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होतो.पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आणि वाॅल या गटारी पासून तीन फुट तरी लांब असली पाहिजे परंतु या ठिकाणी गटार आणि वाॅल जवळ -जवळ आहे.वाॅल च्या खड्डयाला बांधकाम नाही. म्हणून सहज गटारीचे पाणी या वाॅल मधुन पाईपलाईन मध्ये जाते.हा प्रकार म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा आहे.नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात येत नाही का? राऊळनगर परिसरातील नागरिकांनी १४०० रुपये पाणीपट्टी भरुन दुषित पाणी प्यायचे का? जर पाहायचे असेल तर नळ बंद करण्याचा वेळेस पहा कि कसे पाणी पीत असतील ते पाणी स्वता पिऊन खात्री करावे....
0 Comments