Header Ads Widget

*. घरकुल साठी इंजिनियर मागतात लाभार्थी कडून5000 रुपये ते15000 हजार रुपयाची मागणी*


 
मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे.
 
सविस्तर माहिती अशी कि सुराय, चुडाणे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर झाले असून चुडाणे गावातील एका गरीब लाभार्थीला घरकुल मंजूर असून त्याने खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेवून घरकुल काम पुर्ण केले असून काम झाले मात्र त्याला अद्याप २ नच हप्ते मिळाले आहेत1500 रुपयाचा पहिला हप्ता व70.000 हजाराचा दुसरा हप्ता. मात्र उर्वरितत हप्तेसाठी फिरत असून आज कंटाळून पोलीस शोध पेपरचे वार्ताहरांशी बोलणे केले असता. सचिन पाटील नामक इंजिनिअर मस्टर पूर्ण करण्यासाठी15000 हजार रुपये मागणी केली.  
आमच्या वार्ताहरांनी त्यांचाशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली संपर्क कट केला . सदर इंजिनियर याने चुडाणे येथील रहिवाशीला पकडून त्यांचा मार्फत आज5000 रू शेवटी घेतलेच तरी घरकुल बाबत चाललेल काळा बाजार शिंदखेडा BDo थांबवतील का? अशी बाबळी आशा घरकुल लाभार्थीची आहे. सदर घरकुल लाभार्थी हा अत्यंत गरीब असून त्याला धमकी देण्यात आली कि यापुढील हप्ते तुला लवकर देणार नाहीत तो लाभार्थी पत्रकाराकडे धाव घेतली व मला तुमच्या मार्फत तरी न्याय मिळेल अशी गय वया करू लागला जर सदर लाभार्थीस त्याचा मंजूर घराचा हफ्ता न मिळाल्यास शिंदखेडा येथील बिडिओ ऑफिसला २५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले 
सदर घरकुल लाभार्थी एकटाच कमवणारा आहे. आई विधवा आहे तिची नेहमी तब्येत ठिक राहत नाही. सतत गोळ्या, औषधीसाठी पैसे लागतात दवाखाना करत असतो. अशातच ह्या इंजिनियर ने गावाच्या एका व्यक्तीमार्फत५००० रुपये मागणी केली व मी आज त्याचाकडे दिले व याच्या पहिले१००० रुपये दिले आहेत असे एकूण६००० रुपये मी दिले आहेत मी बिडिओ साहेबांच्या समोर सांगण्यास तयार आहे. तरी पुढील हफ्ते लवकरात लवकर मिळावेत मी सर्व कागदपत्रे जमा केले असून । फिरवाफिरवी का करतात. घराचे काम झाले उर्वरित रक्कम खात्यावर जमा करावी

Post a Comment

0 Comments