शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभर राबविण्यात येत असलेल्या हरघर तिरंगा या मोहिम अभियानांतर्गत 79 वा स्वतंत्र दिवस राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव व्हावा म्हणून या वर्षाच्या शासनाच्या टॅगलाईन प्रमाणे हरघर तिरंगा हर घर स्वच्छता या टॅगचा वापर करत शाळेत स्वच्छतेसाठी
श्रमदान, तसेच स्वच्छ सुजलगाव प्रतिज्ञा घेत स्वच्छतेची रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी.जे.पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील,श्री डी एच सोनवणे, श्री जे डी बोरसे, श्रीमती एन जे देसले यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या औचित्य साधून नगरपंचायत शिंदखेडा यांच्यामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली तसेच या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.तसेच नुकताच पार पडलेल्या रक्षाबंधनाचा उत्सव शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकडून सुरेख राख्या तयार करून त्या मुलांच्या हातावर बांधत पवित्र भाऊ,बहिणीच्या नात्याचा प्रेमाचा संदेश देण्यात आला. राखी बनवण्यासाठी कलाशिक्षक श्री एल पी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.
0 Comments