शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील साळवे ग्रामपंचायत सरपंच पदावरून वाद विरोधकांनी केलेल्या अतिक्रमण घरात राहत असल्याचे दाखवत आरोप जिल्हाधिकारी धुळे यांकरवी सरपंच उषाताई संतोष वाघ यांना अपात्र ठरवले होते. त्यावर सरपंच सौ.वाघ यांनी उच्च न्यायालय ( हायकोर्ट ) संभाजीनगर येथे धाव घेऊन एक आगस्ट रोजी न्यायालयाने साळवे ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच उषाताई संतोष वाघ यांना कायम राहतील असा न्यायनिर्वाळा दिल्याने समर्थकांनी आनंद व्यक्त करित जल्लोष साजरा केला. साळवे येथील रहिवासी रमेश खंडेराव शिंदे यांनी विरोधाच्या बाजुने निवडणूकीचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी खोटे व बनावट पुरावे सादर करुन जिल्हाधिकारी धुळे व विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडे साळवे च्या लोकनियुक्त सरपंच उषाताई वाघ हया सासरच्या अनधिकृत घरात राहत असल्याचे कारण दाखवत विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या दि.23/06/25 आदेशानुसार जिल्हाधिकारी धुळे यांनी दि. 06/02/25 रोजी दिलेला आदेश कायम ठेवुन सरपंच पद अपात्र ठरवले होते. म्हणून दिलेल्या निकालाविरोधात उषाताई संतोष वाघ यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात (हायकोर्ट) याचिका दाखल केली. सदर याचिकेवर दि.01/08/25 रोजी उच्च न्यायालयात न्यायनिर्वाळा त्यात उषाताई वाघ या बारा वर्षापासून स्वतंत्र पणे भाडयाच्या घरात राहते व त्यांचा सासरच्या घराशी काही एक संबंध नाही. याचे पुरावे म्हणून भाडेकरार व रेशनकार्ड सादर केले आहे. मात्र जिल्हाधिकार्यांनी गट विकास अधिकारी शिंदखेडा यांच्या अहवालानुसार आदेश देवुन अपात्र ठरवले आणि विभागीय आयुक्तांनी तो आदेश कायम ठेवला. यावर न्यायालयात याचिकाकर्ते चे म्हणण्यानुसार ती स्वतंत्र राहते, सासऱ्याच्या बांधकामाशी तिचा संबंध नाही. भाडेकरार व रेशनकार्ड दुर्लक्षित केले गेले.सासऱ्याचे बांधकाम शासकीय जमिनीवर आहे याचा ठोस पुरावा नाही. असे असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सासऱ्याचे बांधकाम झाले हे मान्य,परंतु याचिकाकर्त्यां 2017 पासून स्वतंत्र राहत आहे याचा पुरावा आहे. तिच्या निवडणूकीपुर्वीच स्वतंत्र राहत आहे. त्या 2023 साली निवडुन आल्याने तिच्यावर अपात्रतेचा परिणाम होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या जाणाबाई विरुद्ध अतिरिक्त आयुक्त प्रकरणातील नियम येथे लागू होत नाही कारण याचिकाकर्त्या त्या अनधिकृत बांधकामात राहत नाही. म्हणून याचिकाकर्ते यास अपात्र धरण्याचा आदेश रद्द करण्यात येत आहे. असा न्यायनिर्वाळा न्यायमुर्ती एस.जी.चापलगावकर यांनी दि. 1 आगस्ट 25 रोजी दिला. याचिकाकर्ते कडुन एम.एस.शहा यांनी काम पाहिले. तर राज्याचे सहाय्यक सरकारी वकील एस.पी.जोशी, प्रतिवादी वकील एम.व्ही.भामरे यांनी काम पाहिले. निकालावरून साळवे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी उषाताई संतोष वाघ कायम राहतील हे सिद्ध झाले. त्यानंतर शिंदखेडा गटविकास अधिकारी यांनी दि.8/8/25 दिलेल्या पत्राद्वारे साळवे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच उषाताई संतोष वाघ यांना सरपंच पदाचे अधिकार कायम करणेबाबत चे अधिकृत पत्र आर.एम.नेतनराव गट विकास अधिकारी शिंदखेडा यांनी बहाल केले. पत्र मिळाल्यावर साळवे ग्रामपंचायतच्या आवारात समर्थकांनी आनंद साजरा करत जल्लोष करण्यात आला. त्यात अधिकृत लोकनियुक्त सरपंच उषाताई वाघ, गटनेते संतोष वाघ, प्रकाश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते राहुल बडगुजर, अनिल पुंजु पाटील, मनोज अशोक जाधव, प्रफुल उदयसिंग गिरासे, समाधान रमेश बोरसे, डिगंबर कोळी, प्रमोद नवल बोरसे व समर्थक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो घोषणा देत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
0 Comments