*"जनमत-च्या" बातमीची तात्काळ दखल घेत,राष्ट्रीय महामार्ग विभागाने सार्वजनिक विभागामार्फत कामाला चालना दिली...*
*सतत सुरू असलेल्या पाऊसामुळे पुलाची दुरूस्ती कोंळबली....*
*रोडाच्या कामाचे श्रेय घ्या- पण काम उभ्या रात्रीत होण्यासाठी आणखी संघटनांनी अर्जफाटे,मोर्चे काढण्याची गरज...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील रहदारीच्या मुख्य रस्ता अमरावती नदीवरील मोठ्या पुलावर नुकतेच मोठमोठे जीवघेणे खड्डे पडल्याने जनमत-ने खालून-वर प्रशासनाच्या निदर्शनास वरील परिस्थिती आणून दिली. प्रशासनानेही त्याच दिवशी म्हणजे दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी अमरावती नदीवरील मोठ्या पुलावर खड्डे ज्या-ज्या ठिकाणी असतील. त्या ठिकाणी दर्शनी खड्ड्याभोवती दगडे लावले.जेणेकरून हया रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या, पायी ,मोटरसायकल, चारचाकी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष जायला पाहिजे व गाडी हळू करून पुढे मार्गेथ व्हायला पाहिजे, असे प्रवासी जीवहित पाऊल उचलत लगेच त्याठिकाणी पुलाच्या दुरूस्तीसाठी रेतू व इतर साहित्य टाकण्याचा कामाला सुरुवात केली. मात्र हवामान खात्याचा अंदाजानुसार आपल्या तिघी जिल्ह्यात म्हणजे खान्देशात पुढील चोवीस तास मुसळधार पाऊसाचा इशारा दिला असल्याने दुपारीच पाऊसाने सुरूवात देखील केल्याने मोठ्या पुलावर डांबरीकरण-डागडुगी करण्याचे साहित्य मागील दोन दिवसांपासून पडून आहे व आज समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकाला माहित आहे की,पाणी व डांबराचे कधीच पटत नाही. म्हणून राष्ट्रीय महामार्ग व बांधकाम विभाग ही पाऊस सुरू असताना पुलाची डागडुगीकरण करणार नाही. शेवटी शासनाचे पैसै हे जनतेच्या कराचा माध्यमातून गोळा झालेला पैसा म्हणजेच जनतेचा पैसा असतो. मात्र ह्या पुलाच्या दुरस्तीसाठी आज फक्त एकच पक्ष एकवटला असुन,येणाऱ्या दोन तीन दिवसांत आणखी संघटना, पक्ष एकत्रित येऊन तक्रारी-निवेदन, मोर्चे काढायला पाहिजे,असे समाजमन म्हणत आहे.
कारण ही सुवर्ण संधी गावातील अनेक रथी-महारथी,सेवाभावी संघटना, ग्रुप,पक्ष यांच्या विकासाच्या, संघर्षाच्या उंचीत भर घालणारी आहे. मागे हा विषय एका पक्षाने उचलला होता.तेव्हा टेंपररी थुक लावून हा रस्ता चिपकवण्यात आला होता.मात्र पंधरा-वीस दिवसात एक-दोन पाऊस मुसळधार पडल्याने पुन्हा ह्या मोठ्या पुलावर खड्ड्यांची परिस्थिती जैसे-थै झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दैनंदिन होणाऱ्या ट्रँफीच्या व लहान-सहान वादविवादाच्या,अपघाताच्या घटनांना कंटाळून हा विषय जनमत-पर्यंत पोहचवला.जनमतनेही जनताभिमुख तक्रारीची दखत घेत,लागलीच बातमी प्रसारित करून शासनाला जागवले व शासनानेही त्याच दिवशी प्रतिसाद देत बांधकाम साहित्य पुलावर टाकले. कारण उद्यापासून म्हणजे एखाद दिवसात गावात श्री च्या आगमनाची लगभग मोठ्या जोरा-शोरात सुरू आहे. त्यामुळे जादातर गणेश मंडळे ह्या पुलावरून विसर्जनाचा मार्ग निवडतात.तसेच ह्या पुलावरून आम्ही मागील बातमीत जसे सांगितले की,विविध शाळा-महाविद्यालयामध्ये दैनंदिन हजारो विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ये-जा करतात, तसेच विविध रहिवासी भागातील नागरिक, नासिक-धुळे-साक्री मार्ग शहादा-नंदुरबार, सुरत गुजरात मध्ये दैनंदिन हजारो वाहने ह्या मोठ्या पुलाचा वापर करत असल्याने, ह्या पुलावर जेवढे मोठे जीवघेणे खड्डे आहेत.तेवढे खड्डे कोणत्याही राष्टीय महामार्गावर दिसत नाहीत. मात्र हा मोठा पुल गावाच्या मध्यभागी असल्याने कोणताही विभाग दुरूस्तीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. मागेही आम्ही दोंडाईचा-निमगुळ उड्डाणपुलाबाबत तक्रार दिली असता.प्रत्येक विभाग आपापले अंग झटकत नगरपालीकेवर जबाबदारी टाकत होते.त्यांचे म्हणणे असे होते की,गावाचा रहिवासी भाग दिवसेंदिवस वाढत असल्याने वरून ह्या रस्त्यावरून वाहनांची संख्याही वाढत आहे. म्हणून नगरपालीकेला आम्ही रस्ते सुपूर्द करायला तयार आहोत. नगरपालीकेने ताब्यात घेण्याची तत्परता दर्शवावी असे एंकदरीत त्यांचे म्हणणे होते. म्हणून आजही उड्डाणपुलावर मधोमध उजेड पडेल असे स्ट्रीट लाईट बसविण्यात आले नाही आहेत. नगरपालीका हद्दीत लाईट लावण्यात आले आहेत. ह्या हद्दीच्या चक्कर मध्ये वर्षीनुवर्ष जुना शहादा रस्ता म्हणजे गावातील रेल्वे गेट ते सिंधी काँलनी रस्ता खड्ड्यांनी माखलेला आहे. म्हणून अजुन तरी पाऊस उघडे पर्यंत अमरावती नदीवरील मोठ्या पुलाच्या दुरूस्तीला सुरुवात होणार नाही. म्हणून गावातील इतरही सेवाभावी, रथी-महारथी,पक्ष,संघटना यांनी अंग-वेळमोडीत ह्या रस्त्यासाठी तक्रार-निवेदन देत, मोर्चे काढायला हवे.कारण यामुळे त्यांच्या कारकिर्दीत निश्चित विकास कांमाची उंची वाढेल. तसेच हा पुल दुरूस्त झाला का, लगेच बिचाऱ्या वर्षानुवर्षे पासुन खड्ड्यातुंन प्रवास करणाऱ्या जुना रेल्वे गेट ते सिंधी काँलनी शहादा रस्त्यांचा दुरूस्तीचाही तक्रार-निवेदनातून कांगवाप्रश्न मार्गी लावाला ऐवढीच रास्त अपेक्षा जनमत गावातील विविध संघटना, पक्ष, सेवाभावी क्लबकडे करत आहे.


0 Comments