अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरमधील जी.एस. हायस्कूलचे उपशिक्षक श्री. रोहित तेले यांची साने गुरूजी माध्य. शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी, अमळनेर येथे संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीच्या कार्यक्रमास
माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे, पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाणे, संचालक मंडळ पदाधिकारी महेश नेरपगारे, ताईसो सविता बोरसे, प्रा. मंदाकिनी भामरे, संजीव पाटील, संजय पाटील, महेंद्र पाटील, हिरालाल पाटील, सेवानिवृत्त केद्रप्रमुख बन्सीलाल भागवत, तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलचे शिक्षक मुकेश पाटील, सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस.सी. तेले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, रमेश देव, भाजप युवा मोर्चाचे देवा लांडगे, आनंद धनगर सर, खा.शी. मंडळ संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधू–भगिनी उपस्थित होते.
यावेळी प्रभाग 16 येथील सामाजिक व युवा कार्यकर्ते रवींद्र पितांबर पाटील, कपिल पाटील, पत्रकार ईश्वर महाजन आणि मित्रमंडळींनी रोहित तेले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
रोहित तेले म्हणाले, “ही फक्त माझी निवड नाही, तर पतपेढीच्या सर्व सभासदांसाठी माझा नवा प्रारंभ आहे. मी संचालक मंडळ, सभासद,यांचे सहकार्य घेऊन शिक्षण आणि
सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देईन. पतपेढीने माझ्यावर विश्वास टाकला पतपेढीच्या अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे मी ऋणात राहील
0 Comments