एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी जसे रक्त दान महत्वाचे असते तसेच आपल्या मनाची मरगळ जाऊन नवीन विचारांची ऊर्जा मिळावी यासाठी चांगल्या पुस्तकाचे दानही ठरते श्रेष्ठ!
कल्पना देशमुख बहू आयामी साहित्यिका या मुळच्या धुळ्याचा असून सध्या त्या नवी मुंबई साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. अनेक साहित्यिक सस्कृतिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. नुकतेच त्यांच्या या न्यू मसाप ग्रुपने मध्यप्रदेशात आपल्या माय मराठीचे साहित्यिक उपक्रम साजरा केला!
या दिवाळी ऑक्टोबर मध्ये या ग्रुपने शब्ध सवांद हा सुंदर वाचनीय दिवाळी अंक प्रसिद्ध केला. श्रीमती देशमुखांनी तो दिवाळी अंक आज रोजी त्यांच्या संभाप्पा कॉलनीतील निवास स्थानी सप्रेम भेट देऊन वाचन सस्कृती प्रचार प्रसारार्थ आपले कार्य सुरु ठेवले. त्यांना त्यांच्या अश्या या साहित्यिक कार्यासाठी अ. खा. उपसंपादिका कै. नलिनी सूर्यवंशी स्मरणार्थ अ. खा. प्रेरणादायी महिला राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
प्रभाकर सूर्यवंशी, संपादक
अभिनव खान्देश,धुळे. 30/11/25
0 Comments