फोटो कॅप्शन- ना. नितीन गडकरी यांना अधिवेशनाचे निमंत्रण देतांना परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब व सरचिटणीस प्रमोद लाजूरकर
पुणे- अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे 44वे राष्ट्रीय अधिवेशन उरळी कांचन पुणे येथे संपन्न होत असून या अधिवेशनासाठी उपस्थित राहावे म्हणून अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिर साहेब व सरचिटणीस प्रमोद लाजूरकर यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी साहेब यांची नागपूर येथे भेट घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे अशी विनंती केली. व तशा आशयाचे रितसर निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा ना. गडकरी साहेबांनी अधिवेशनास उपस्थित राहण्याबाबत होकारही दिला.
खा. डॉ. अमोल कोल्हे हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असून माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब हे अधिवेशनाचे उद्घाटक आहेत.मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक नियम पाळून अधिवेशनाच्या यशस्वीतेची जय्यत तयारी सुरुअसून अधिवेशनासाठी राज्य व राज्याबाहेरून सुमारे दोन हजार पत्रकार उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
*******
फोटो कॅप्शन- ना. नितीन गडकरी यांना अधिवेशनाचे निमंत्रण देतांना परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब व सरचिटणीस प्रमोद लाजूरकर

0 Comments