नरडाणा (ता.शिंदखेडा, जि.धुळे) माता 'कुमाता' होऊ शकत नाही, हे म्हटले जात असले तरी या कलियुगात
'वैरी' झालेल्या मातेचे कुरूप कालच्या घटनेतून दिसून आले आहे. एका महिलेने आपल्या पोटी जन्माला आलेल्या नवजात बाळाला मुंबई
आग्रा महामार्गालगत असलेल्या गोराणे (ता.शिंदखेडा, जि.धुळे) शिवारातील एका शेतात बेवारस स्थितीत टाकून दिल्याचे आढळल्याने
परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या पोटच्या गोळयाला अशा पध्दतीने काट्या-कुट्यांमध्ये टाकून देणारी ही कुमाता कोण? असा
सवाल उपस्थित होत आहे. नरडाणा येथील योगेश कदम हे काल (दि.३) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गमनलाल जैन यांच्या शेताच्या बांधावरुन आपल्या शेताकडे जात होते. त्यावेळी त्यांना
अचानक एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. श्री.कदम यांनी या आवाजाचा माग घेतला असता गवताच्या काटेरी झुडपातले ते दृश्य बघून श्री.कदम यांच्या हृदयाचे ठोके अचानक
वाढले. त्याठिकाणी गवतामध्ये एक नवजात अर्भक अशा पध्दतीने कडाक्याच्या थंडीत उघडे पडून आक्रोश करीत असल्याचे पाहून त्यांचे
यांचे मन गहीवरून आले. क्षणभरासाठी श्री.कदम यांना काहीच सुचेनासे झाले. त्यांच्या पाठोपाठ मोराणे येथील पोलीस पाटील मनोज पाटील हे
त्याठिकाणी आलेत. या दोघांनी ताबडतोब नरडाणा पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून संपर्क केला. तसेच गोराणे फाटयावरून त्यांनी त्यांचे सहकारी संदीप कदम, ज्ञानेश्वर साळुखे, कैलास ठाकूर यांना यठिकाणी बोलावले. यावेळी ते नवजात बालक थंडीने गारठले होते आणि
कन्हत होते. बालकाच्या अंगावर मुंग्या चालत होत्या. त्याच्या अंगाला माती लागली
होती. तसेच गवतात व काटेरी झुडपालगत पडलेले असल्याने त्याच्या अंगाला
कानला जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त वाहत होते. पाझर फुटावा, असे दृष्य होते. गोराणे
गावाच्या या होतकरू तरुणांनी मानवतेचे
दर्शन घडवत पोलिसांना तात्काळ त्याठिकाणी
बोनावले. थोड्याच केतनराडाणा पोलिस
ठाण्याचे पीएसआय शरद पाटील, हेमंत राऊत
यांच्यासह पोलिस कर्मचारी शेतात पोहोचले.
त्यानवजात अर्भकाल वाध्यात येत नराडाणा
रोयोल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात
आले. याठिकाणी नरडाणा येथील माजी
उपसरपंच अनिल सिसोदे यांनी त्याबालकाला
उपदार कपडे व शाल करून दिली.
त्यानंतर नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावरे
यांनी त्या बालकावर प्रथमोपचार करुन
बालकाला जिल्हा रुग्णालयाचा बालरोग
विभागात पाठवले आहे. अर्भकाची प्रकृती
स्थिर असून याप्रकरणी नराडाणा पोलीस
पुढील तपास करीत आहेत.

0 Comments