Header Ads Widget

ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी पुत्राची उत्तुंग झेप खोकराळे येथील डॉ. कैलास भटा बोरसे यांची मुक्त विद्यापीठाच्या उपकुलसचिवपदी पदोन्नती



  

धुळे- खोकराळे जि. नंदुरबार येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र डॉ. कैलास भटा बोरसे यांची नुकतीच नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उपकुलसचिवपदी पदोन्नती पदस्थापना झाली. प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदावर पदोन्नती झाली त्यामुळे त्यांचे धुळे-नंदुरबारसह खान्देशातून सर्वत्र कौतुक होत आहे. सन 1991 पासून मुक्त विद्यापीठातील विविध पदांवर प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

डॉ. कैलास बोरसे यांनी सन 2017 मध्ये अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून ‘उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाचे सामाजिक स्थितीचे समाजशास्त्रीय अध्ययन’ या विषयात पीएच्‌.डी. (आचार्य पदवी)  प्राप्त केली आहे. डॉ. बोरसे यांनी प्रशासनात काम करतांना धनगर समाजातील समाजिक स्थितीवर अभ्यास करून शैक्षणिक कार्य देखील सतत सुरु ठेवले आहे. डॉ. बोरसे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच 2018 मध्ये मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध विषयात शोधनिबंध सादर केलेत. या नियुक्तीपूर्वी अमरावती, औरंगाबाद (विदर्भ, मराठवाडा) येथे प्रशासकीय सेवा उत्तमरितीने पार पाडली आहे. खोकराळे परिसरात उपकुलसचिव पदापर्यंत पोहोचणारे ते एकमेव प्रथम व्यक्ती आहेत. त्यांनी पुस्तक लिखाण देखील केले आहे. ‘रिसर्च मेथड इन सोशिओलॉजी’, ‘धनगर समाजाची सामाजिक स्थिती’ ही पुस्तके प्रक़ाशित झाली असून, ‘स्त्रियांची परिस्थिती, समस्या आणि चळवळी’ या विषयावरील पुस्तक प्रकाशन देखील लवकरच पूर्ण होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सोशल चॅलेजेंस ह्युमन व्हॅल्युज्‌ ॲण्ड सिच्युएशन ऑफ इंडियन सोसायटी इन्‌ करंट सिनॅरिओ’  निरक्षरता आदिवासींच्या समस्यांचे मुख्य कारण, राष्ट्रीय स्तरावर सध्याच्या काळात समाजावर मराठी भाषेचा परिणाम, मानवाधिकार आणि शिक्षण, बेरोजगारांची ज्वलंत समस्या : एक सामाजिक अध्ययन, ‘इंडियन फॅमिली सिस्टम्‌ : ॲन्‌ ओव्हरह्यु’ महात्मा गांधीजींच्या विचारांची आज प्रासंगिकता, कौटुंबिक समस्या : एक ज्वलंत विश्लेषण, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण, महात्मा गांधीजींच्या चळवळीचे सामाजिक सर्वेक्षण- एक मूल्यमापन, संत नामदेव महाराजांच्या अभंगातील सामाजिक, शैक्षणिक मूल्यांचा चिकित्सक अभ्यास, ‘कम्पॅरेटीव्ह स्टडी  ऑफ दि मेन प्रोसेस ऑफ सोशल चेंजेस्‌’ इत्यादी विषयांवर विविध कार्यशाळा, चर्चासत्रांत शोधनिबंध सादर केले. मराठी समाजशास्त्र परिषद, नागपूर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचा सभासद म्हणून सक्रिय सहभाग, मुक्त विद्यापीठातील विविध विभागांचे कामकाज, व्यवस्थापन, अभ्यास केंद्र/ महाविद्यालय त्यातील प्रवेश प्रक्रिया, परीक्षा पद्धती, मूल्यमापन पद्धती,  ऑनलाईन मूल्यमापन पद्धती इत्यादी विषयांवर आकाशवाणी, नागपूर, अमरावती, अकोला या ठिकाणी मुलाखती झाल्यात. तसेच अमरावती विद्यापीठात दूरशिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) बी.ए. बी.कॉम. अभ्यासक्रम विकसन समितीवर कामकाज केले. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघात विविध पदांवर सक्रिय सहभाग आहे.

डॉ. कैलास बोरसे हे नंदूरबार जिल्ह्यातील खोकराळे येथील प्रगतीशील शेतकरी व धनगर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून नावलौकिक मिळविलेले कै. भटा श्रावण बोरसे उर्फ भटा भाया यांचे सुपुत्र असून धुळे पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आबा बोरसे यांचे बंधू आहेत. ग्रामीण भागातील एका कष्टकरी शेतकरी पुत्राच्या मुलाने उपकुलसचिव पदापर्यंत घेतलेली कौतुकास्पद उत्तुंग झेप यामुळे डॉ. कैलास बोरसे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

 


 


Post a Comment

0 Comments