Header Ads Widget

*गावात वाढदिवस दोन,सर्वसामान्य जनतेने फिरवले मात्र तोंड....* *वाढदिवसाच्या कार्यक्रमात फक्त शिक्षक कर्मचारी-लाभार्थी- निष्ठावंत व पक्ष- प्रेम असणाऱ्यांनी लावली नियमित हजेरी....*



*नेताही मोठा आणि कार्यकर्त्यांची निष्ठाही मोठी म्हणजे गावात बँनरबाजीची स्पर्धा झाली पण कोणी ठराविक जागेवर बँनर लावण्यासाठी भांडले नाही....*

*दिवसभर गर्दी असणाऱ्या कार्यक्रमांकडे कोवीळ-प्रमुख व पोलीस विभागानेही फिरवली मानपाठ....*

*जनमत-*

*दोंडाईचा-* काल गावात एकाच दिवशी दोन मातब्बर-माजी मंत्री यांचे वाढदिवस सोहळानिमित्त दिवसभर विविध कार्यकर्त्यान मार्फत समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात आले होते. मात्र ह्या कार्यक्रमात आगामी नगरपालीका निवडणुक उमेदवारी दुष्ट्रीकोन डोळ्यापुढे ठेवून काही इच्छुक -भावी नगरसेवक उमेदवारांनी आप-आपला नेता तर काहींनी चोरून-लपून दोघी आपल्या आवडत्या नेत्यांची भेट घेतली तर दुसरीकडे दरवर्षी दोघी नेत्यांकडे मर्जीतला-कानाखालचा गर्दी भासवणारा जो शिक्षक कम कर्मचारी-नोकर वर्ग तसेच लाभार्थी-निष्ठावंत-पक्ष प्रेम असणारा नियमित दरवर्षी हजेरी लावणारा वर्गच दिसुन आल्याचे चित्र होते.यात मात्र सर्वसामान्य जनता व तिच्या चेहऱ्यावर असलेला हर्ष-उल्हास-आनंद कुठेच दिसुन आला नाही.पण कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याला गावात मोठा करण्यासाठी मेन-मेन चौकात बँनरबाजी लावायची स्पर्धा करत. बँनर ठराविक जागेवरच लावायला पाहिजे. यासाठी मात्र खुप भांडले,अशी एकही घटना ऐकायला मिळाली नाही. यासर्व परिस्थितीत गावात कार्यकर्ते-लाभार्थी-निष्ठावंत- शिक्षक कर्मचाऱ्यांचा जोश- उत्साह-आनंद पाहून,अनेक सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार असल्याची कल्पना असुनही कोवीळ-प्रमुख अप्पर तहसीलदार व पोलीस विभागाने मात्र सत्ता व पावरपुढे जनतेचे आरोग्य धोक्यात टाकत.दिवसभरातील विविध कार्यक्रमांकडे मानपाठ-डोळे व विचार-कर्तव्य दुर्ष्टी दुसऱ्याच कामाकडे फिरवत-वळवत.जसे गावात काही घडत नसुन सर्व शांत परिस्थिती आहे, असे भासवले. म्हणुन मा.कलेक्टर साहेबांचे दिवसा पाच लोक एकत्र आल्यास जमावबंदी व रात्री संचार बंदीचे नियम पाळायचे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर दिवसभर सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसण्यावरून पडत आहे.

भारतीय राज्य घटनेत जनता ही केन्द्र बिंदू मानून कोणताही निर्णय घेतांना सरकार जनतेचे हित-आरोग्य जोपासायला प्रथम प्राधान्य दिले जाते. म्हणून देशात  दिल्लीपासुन तर गल्लीपर्यंत रोज घडणाऱ्या घटनेत जनता काय म्हणते. म्हणजे जनतेची दखल-विचार घेणे-मानने खुप गरजेचे आहे. मात्र दोंडाईचा शहरात सरकार-जनतेचे प्रतिनिधी व जनता-सरकार मधील दुवा दोघी माजी मंत्री यांना वाढदिवसानिमित्त जाणुन-बुजून विसर पडला की काय? फक्त कार्यकर्ते प्रेम-दिखावुत्ती प्रती,  करोना आजारानंतर जलद गतीने देशात वाढणाऱ्या-ओमीक्रोण परिस्थितीवर वाढदिवस साजरा न करता, गर्दी न जमवता. जनतेचे-नागरिकांचे हित-आरोग्य कसे जोपासले जाईल. ह्या महत्वाच्या दुरदुष्ट्रीकोनातुन विचार करत दिवसभरातील कार्यक्रम रद्द करायला हवे होते.मात्र मागील वर्षी कोवीळ कारणाने पुढे ढकलेली दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेची सार्वत्रिक निवडणुक विजय लक्ष डोळ्यांपुढे ठेवून. दोघेही सरकारची पगार-पेन्शन घेणाऱ्या जनता-सरकारमधील लोकप्रतिनिधींनी शिक्षक कार्यकर्ते-लाभार्थी-निष्ठावंत लोकांना आवर न घालता. आदल्यादिवशी बँनरबाजी-दिवसभर भेटीगाठी- विविध कार्यक्रम-लोकार्पण-डिजेचा तालवर गर्दी जमवत-नाचत. आपल्यासह उपस्थित जनतेचा जीव धोक्यात टाकला. अगोदरच येथील जनता मागील पाच वर्षापासुन कै. धर्मा पाटील प्रकरण, ज्ञानोपासक संस्था मधील लहान मुलीवर अत्याचार प्रकरण,चांगला शिक्षक महेंद्र पाटील अटक प्रकरण,घरकुल प्रकरण आदी नावाजलेल्या पण निव्वळ एकमेकांना शह देणाऱ्या- राजकारण-सत्ता-पावरचा फायदा घेत. फुसका बार ठरणाऱ्या घटनावेळी दोघी राजकारणी मंडळीच्या निष्ठावान-लाभार्थी-प्रामाणिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा गावात मोर्चा काढत-निवेदने देत-गाव बंद ठेवले.त्यानंतर मग मागील २०१९-२०२० वर्षात करोना महामारीने थैमान घालत. सर्व जनजीवन विस्कळीत केले. यात सरकार कडून काही वर्गाना आधार मिळाला. तर काही वर्गाला डुबण्या अगोदर काडीचा सहारा दिला. पण याच्यात म्हणजे करोना काळात व अगोदरच्या वेळोवेळी गाव बंद पुकारण्यात मारला गेला.तर तो फक्त व्यापारी आणि व्यापारी वर्ग आहे. करोना काळातही जनतेचे हित-आरोग्य जोपासण्याच्या उद्देशातुन जनता कर्फूच्या नावावर लोकप्रतिनिधी लोकांनी अधिकारी लोकांना हातात घेऊन, किती दिवस गावातील व्यापार बंद ठेवले, हे सर्वसामान्य नागरिकांना व हातावर ह्याचा-त्याचाकडे काम करणाऱ्या गावातील लोकानां चांगल्या प्रकारे माहिती आहे.

आताही जर सरकार करोना नंतर जलद गतीने वाढणाऱ्या ओमीक्रोण आजारावर जनतेचे हित-आरोग्याची काळजी घेत, लाँकडाऊन न लावता.फक्त दिवसा गावात-सार्वजनिक ठिकाणी-दुकानांवर पाच पेक्षा जास्त गर्दी केल्यास जमावबंदी व रात्री नऊनंतर संचार बंदीचे आदेश असताना. दोघेही सरकारचे प्रतिनिधी व जनता-सरकार मधील दुवा समजले जाणाऱ्या माजी मंत्रीनी आपापले वाढदिवस दिवसभर कार्यक्रम आखुन-समाजसेवा-मदत- अन्नदान-लोकार्पण-डिजे लावून गर्दी जमवत-नाचत. निष्ठावंत-लाभार्थी-प्रामाणिक- शिक्षक कम कार्यकर्त्याचा आमिषाला बळी पडत.आपल्यासह त्यांच्या जीव धोक्यात टाकायला नको पाहिजे होता. म्हणून गावात वाढदिवस दोन, पण सर्वसामान्य जनतेने ह्या महान नेत्यांच्या वाढदिवसाचे स्वतः च्या चेहऱ्यावर कोणतेही हर्ष-उल्हासांची भावना न जाणू देता.न हार-तुरे घेऊन हजेरी न लावता. दिवसभरातील सर्व कार्यक्रमांकडे तोंड फिरवले.

मात्र गावात वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व वाढदिवसाच्या दिवशीही दोघी गटाकडे शिक्षक कर्मचारी-लाभार्थी-निष्ठावंत-व पक्ष प्रेम करणाऱ्या प्रामाणिक एका गटाने विविध चौकात जागा सांभाळत आपल्या नेत्याचे बँनर बांधले.त्यांमुळे दुसरा गट हे पाहून,लगेच अँक्टीव्ह होत.त्यांनाही आपल्या नेत्याचे चौकाचौकात मिळेल त्या जागेवर हेवेदावे न करता-न भांडता बँनरबाजी केली व गावातील मेनमेन रस्ते पँक करत तुमच्या पेक्षा आमच्या नेता किती मोठा हे सिद्ध करत.नेताही मोठा आणि कार्यकर्त्याची निष्ठाही मोठी,असेच दोघीकडच्या बँनरबाजीवरून लक्षात आले. त्यामुळे त्यांचा हा जोश-उत्साह-आंनद पाहत.नेहमी प्रसिद्धी झोतात असणारे कोवीळ प्रमुख तथा अप्पर तहसीलदार व पोलीस विभागाने दिवसभर माणसांनी गर्दी असलेल्या विविध कार्यक्रमांकडे मानपाठ फिरवली.म्हणून येणाऱ्या काळात जनतेला कोवीळचे नवीन नियम पाळायची की नाही. याबाबत शंका निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments