----------------------------------------
धुळे जिल्ह्यातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील १४ अशा २२ राज्यस्तर सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता (रूपये ११५ कोटी ३ लक्ष २० हजार ३११) देणेबाबतचा जलसंपदा विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
गेल्या अनेकवर्षांपासून उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्ती साठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यासंधार्भात पाठपुरावा करत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांकडे संदीप बेडसे पत्रव्यवहार करीत होते. आज याबाबतचा शासन आदेश निघाल्याने स्वतः मंत्री जयंत पाटील यांनी आदेशाची प्रत श्री बेडसे यांना दिली आणि लाडू भरवून शाबासकीही दिली.


0 Comments