शिंदखेडा--- यशवंत वनजी पवार अण्णा या नावाने सर्वत्र परिचित वरसुस या लहानश्या गावात वास्तव्य शेती व्यवसाय याकडे सातत्याने लक्ष संशोधनात्मक शेती करण्याकडे त्यांचा सातत्याने कल असायचा नवीन पिकपेरा जाणून घेऊन त्यातूनही नवीन काय घडवता येईल यासाठीही त्यांचा प्रयत्न शेतीविषयक मेळाव्यात ते आपले विचार व्यक्त करीत असत त्यातून कृषी विभागातील अधिकारी वर्गही चर्चा करीत असे
अण्णांच्या शेतीबाबतची संकल्पना व त्याबाबतची दखल महाराष्ट्र शासनानेही घेऊन त्यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते त्यांच्या या संशोधनात्मक विचारांची प्रेरणा घेऊन त्यांची नात मित्तल मोतीलाल पवार हिने कृषी शिक्षणाकडे प्रवेश घेतला वेळोवेळी ती वरसुस परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असते हे नमूद करावेसे वाटते
अण्णासाहेब शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर असायचे विद्यार्थ्यांना शेतीविषयक प्रोत्साहनही त्यांचे वेळोवेळी लाभत असे शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे ते जेष्ठ संचालक होते त्यांच्या अकस्मात जाण्याने पवार परिवारावर दुःखाचा आघात कोसळला आहे त्याप्रमाणे एक शांत सुस्वभावी मार्गदर्शक संचालक म्हणूनही ते परिचित होते त्यांनी आपल्या मुलांवरही शैक्षणिक संस्कार केले मोतीलाल पवार हे एज्युकेशन ट्रस्ट मध्ये प्रयोगशाळा सहाययक पदावर कार्यरत आहे तेही भजन कीर्तन यात मृदनग वादक म्हणून परिचित आहे हे सारे संस्कार अण्णांनी आपल्या परिवारात केले
अण्णासाहेब यशवंत पवार यांच्या आत्म्यास इशवर सदगती देवो ही प्रार्थना पवार परिवाराच्या दुःखात शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट चे चेअरमन व्हॉइस चेअरमन व सर्व संचालक सहभागी आहे
शब्दांकन- प्रा प्रदीप दीक्षित सेवानिवृत्त मुख्याध्यापक व संचालक शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट शिंदखेडा

0 Comments