____ शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव जवळ शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून सोनवद मध्यम प्रकल्प हे धरण पूर्ण केलेले आहे सध्या हे धरण पूर्णपणे पाण्याने शंभर टक्के दरवर्षी भरते दरवर्षी येथील मुख्य पाठ उपपाट चाऱ्या यांची जेसीबी मशीन द्वारे साफसफाई केली जाते काटेरी झुडपे काढले जातात एक ते नऊ उप पाट चाऱ्या असून मुख्य पाठाच्या प्रवेशद्वाराजवळ व सर्व
चारीयांच्या प्रवेशद्वाराजवळ फक्त साफसफाई केली जाते तसे पाहता हेड टू टेल पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काटेरी झुडपे व गवत काढले गेले पाहिजेत हे काम पंजीकृत सोसायटी मार्फतच केले पाहिजे असा शासनाचा आदेश आहे परंतु शासनाचे नियम झुगारून धातूर माथुर कोणाच्यातरी सोसायटीच्या नावे काम करून लाखो रुपयांची बिले दरवर्षी काढली जातात सफाई मात्र देखावा म्हणून केली जाते दर चार महिन्यांनी पुन्हा गवत व काटेरी झुडपे तयार होतातच मग पुन्हा असाच उपक्रम सतत चालू असतो म्हणजे एकाच कामासाठी पुन्हापुन्हा शासनाचा दरवर्षी खर्च हे नेमके गौडबंगाल काय चालले आहे? संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य पाट व एकूण नऊ उपचाऱ्या येथे प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी म्हणजेच आपल्याला समजेल दर वर्षी 40 ते 45 लाख रुपये या कामावर खर्च होतात मोजून दोन-तीन दिवसात डागडुजी केली जाते देखावा केला जातो म्हणून यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून कामावरून काढावे व या संदर्भात अति बारीक चौकशी करावी काम कोणामार्फत झाले आहे कसे झाले आहे बिल किती रुपयाचे होते काम कशा पद्धतीचा चे झाले आहे का नुसता देखावा आहे याची खातरजमा सुद्धा करावी अन्यथा असे न झाल्यास वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा या कामात समावेश आहे असे समजण्यास हरकत
नाही यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्री यांना मी प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार आहे म्हणून संबंधितांनी तातडीने या कामाची चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून शासनाचा मागिल दहा वर्षापासून चा झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डीसी बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील डोंगरगाव यांनी केलेली आहे


0 Comments