भूमी अभिलेख कार्यालयात जो देईल दाम त्याचे होते काम …मनमानी कारभारा मुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त….?
येथील भूमीअभीलेख कार्यालयात जो देईल दाम, त्याचेच होईल काम अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याने सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेगाव येथील गुजराती हाउसिंग सोसायटी परिसरात राहणारे ओमप्रकाश गिरधारीलाल टेकडीवाल यांनी दोन वर्षांपूर्वी येथील भूमी अभिलेख कार्यालयात नजुल सीट गट नंबर 14 लेआउट प्लॉट नंबर 28 ची नोंद अधिकार अभिलेखात करण्यासाठी रीतसर अर्ज केला होता.
मात्र भुमि अभिलेख कार्यालयात संबंधित अधिकार्यांची आर्थिक इच्छापूर्ती होत नसल्याने त्यांच्या नावाची नोंद अधिकार अभिलेखात करण्यास मागील दोन वर्षापासून संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप अर्जदार ओमप्रकाश गिरधारीलाल टेकडीवाल यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक शेगाव यांच्याकडे ओमप्रकाश टेकडीवाल यांनी शिट नंबर 14 प्लॉट नंबर 2/8 क्षेत्रफळ 540 पाचशे चाळीस चौरस फूट मध्ये अधिकार अभिलेखात नावाची नोंदनी करण्याबाबत दोन वर्षापूर्वी अर्ज दिलेला आहे.

0 Comments