शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्त्री शिक्षणासाठी धडपडणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव तथा आरोग्य सभापती श्रीमती मीराताई मनोहर पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती एम डी बोरसे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाने तसेच श्रीमती एस एस पाटील श्री बी जे पाटील श्री डी एच सोनवणे आदी उपस्थित होते
कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गीते विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान करून गायली सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व त्यांचे स्त्री शिक्षणातील कार्य हे श्री एस ए पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती एन जे सनेर श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती पी एस पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री मनीष माळी यांचे सहकार्य लाभले

0 Comments