शिंदखेडा प्रतिनिधी=. शिंदखेडा शहरातील बंगला भिलाटी सह तिथं आदिवासी वस्तीत गेल्या 60 ते 70 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाली आहेत परंतु नियमानुसार सदरची घरे अतिक्रमित असल्याने मंजूर झालेले घरकुले थांबले आहेत आदिवासी बांधव वंचित राहत असून याबाबत थेट नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांची राष्ट्रवादीचे नेते संदीप दादा बेडसे यांनी भेट घेऊन निवेदन दिले दरम्यान दिलेल्या निवेदनात नुसार मुख्याधिकार्यांना खास बाब म्हणून अधिकार देण्यात यावे असे स्पष्ट आदेश नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे शहरातील आदिवासी बांधवांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे
शिंदखेडा नगरपंचायत हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अद्याप एकाही लाभार्थ्याला मिळालेला नाही शहरातील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी व जागा मोजणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माझी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी थेट राज्याचे नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली माजी नगराध्यक्ष दीपक देसले दीपक आहिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी संदीप बेडसे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती त्यामुळे नगर विकास मंत्र्यांनी नगर विकास विभागाचे राज्याचे प्रधान सचिव यांना आदेश काढून कार्यवाहीचे अधिकार नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना देण्यात यावे असे आदेश केले आहेत दरम्यान शिंदखेडा नगरपंचायतीचे मध्ये प्रधानमंत्री आवास योजने करिता अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी जागा मोजणी करणे त्यांची फी भरणे इत्यादी पूर्तता करण्यासाठी भूमि अभिलेख विभाग व नगरपंचायत शिंदखेडा यांच्याकडून कित्येक दिवसापासून हे प्रकरणे प्रलंबित असून शहरातील या भागांची गटांची मोजणी करणे त्यांची फी भरणे कागदपत्रांची पूर्तता करणे या सगळ्या कामांची जबाबदारी नगरपरिषद व भूमि अभिलेख विभागाची आहे शिंदखेडा येथील गट नंबर 362 यातील कायम मोजणी पोटहिस्सा मोजणी मोजणी रक्कम 35000 शिंदखेडा गट नंबर दोन हद्द कायम मोजणी रक्कम सहा हजार तसेच गट नंबर बाराशे पंधरा नगरभूमापन परी सीमेतील मोजणी रक्कम दोन लाख 68 हजार असे एकूण शासकीय मोजणी रक्कम असून नगरपंचायतीने कार्यवाही करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी शहरातील आदिवासींच्या प्रश्नात हात घालून अतिक्रमित घरकुलांच्या समस्या मार्गी लावण्याचे ठरवल्याने समाधान व्यक्त होत आहे


0 Comments