
================================ डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील= डोंगरगाव आणि परिसरात 7 मार्च 2022 रोजी रात्री झालेल्या बेमोसमी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे वाघाडी बुद्रुक येथील वसंत दौलत पाटील यांचा गहू जमिनीवर भुईसपाट पडलेला आहे त्याच पद्धतीने परिसरात कमी अधिक प्रमाणात शेती बागांचे व पिकांचे नुकसान झाले आहे या परिसरात गहू हरभरा दादर जवस बाजारी कांदा मिरची भाजी पाला पपई इत्यादी अनेक विविध शेती पिके आहेत सध्या कापणीस आलेले गहू हरभरा दादर यांचे नुकसान झालेले आहे पाऊस पडल्यामुळे त्यांची प्रतवारी ही खराब होणार आहे परिसरात कांदा लागवड भरपूर असल्याकारणाने सध्या झालेल्या बेमोसमी वादळी थंड पावसामुळे कांद्याच्या पोग्यात थंड पाणी गेल्यामुळे कांदा जास्त दिवस साठवून ठेवता येणार नाही तसेच विविध रोग यामुळे तयार होतात एकंदरीत हा पाऊस शेती पिकांसाठी हानि कारक असल्याने परिसरात कमीअधिक प्रमाणात विविध पिकांचे नुकसान झालेले असून त्यांचे तातडीने पंचनामे शासनस्तरावरून होऊन शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी व जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे
0 Comments