Header Ads Widget

सोनगीर, मिशन वात्सल्य’ समिती तर्फे कोरोणा एकल महीला मेळावा तथा रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिर



सोनगीर;- कोरोणामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ समिती तर्फे कोरोणा एकल महीला मेळावा तथा रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिर येथील बस स्थानक जवळील सिंधू त्र्यंबक हॉल मध्ये सोमवारी घेण्यात आले.


मिशनअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजना कुटुंब निवृत्तिवेतन योजना, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना, शुभमंगल सामूहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच, स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरून घेऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.मेळावा प्रसंगी मान्यवरांनी विविध योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्य‌क्षस्थानी महीला बाल कल्याण समितीच्या सभापती धरती देवरे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गायत्री सैंदाणे होत्या.यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा मिशन वात्सल्य समितीचे सचिव दिपाली देसले, सप्तशृंगी महीला संस्थेच्या अध्यक्षा मिनाताई भोसले,बाल विकास प्रकल्प अधिकारी आर.व.ही बिरारी, श्रीमती एस.बी पाटील, तृप्ती पालवे,जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरी, सरपंच रुख्माबाई ठाकरे, मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य ईश्वर पाटील,मंडळाधिकारी राजपूत, तलाठी जितेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य आरीफ खॉ पठाण,पर्यवेक्षीका बेबी चौधरी,जोस्ना पाटील, आदींनी योजनांची माहिती दिली.सुत्रसंचलन वैशाली निकम यांनी तर आभार सुजाता बोरसे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments