Header Ads Widget

धुळे शेतकऱ्यांनी महामार्ग केला ब्लॉक; दोन तास वाहतुक खोळंबली



धुळे : सुरत- नागपूर महामार्ग आडवत शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभारा विरोधात संतप्त होत रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या.
वीज वितरण विभागाच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील वीज वितरण विभागाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा कार्यक्रम सुरूच असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) रास्ता रोको केला. नेर, नांद्रे, भदाणे शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत- नागपुर या महामार्गावर भर उन्हात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. साधारणतः दोन तास शेतकऱ्यांनी आक्रमक रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी वीज वितरण विभागाचा विरोधामध्ये संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी वीज बिल वेळेत न भरल्यास वीज खंडित तसेच रोहित्र बंद करण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे. यामुळे येथिल शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली.

शेतात (Onion) कांदा, गहू, हरभरा, मका या पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. उन्हाचा तीव्र तडाखा असल्याने शेतकऱ्यांची पिके जळू शकतात. पिकांची अवस्था दयनीय असताना वीज विद्युत कार्यालयातून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित तसेच रोहित्र बंद करण्यात आले आहे. यामुळेच रस्ता रोको आंदोलन केले. काही शेतकऱ्यांनी तर पेट्रोलची कॅन सोबत आणलेली. वेळेत हक्काची वीज द्या अन्यथा स्वतःला पेट्रोल टाकत जाळून घेऊ; अशी तीव्र भुमिका आंदोलक शेतकरींची होती.

Post a Comment

0 Comments