यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे, सोंडले, बाभळे येथील सरकारी गावठाण जमिनीची फेरचौकशी व्हावी, जिल्ह्यात ज्वारीच्या कणसाला दाणे लागलेले नाहीत त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करावी, शेतकर्यांच्या पशूधनासह विद्युत मोटारी चोरीला जात आहेत. केबल वायर चोरली जात आहे. मात्र पोलिस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना पिक विम्याची भरपाई रक्कम मिळावी, शेतकर्यांची वीज खंडीत केली जात असून ही मोहिम थांबवून शेतकर्यांना नियमित वीजपुरवठा करावा. कोरोना संकटामुळे एकल बनलेल्या जिल्ह्यातील महिलांना मदत मिळावी, योजनांचा लाभ मिळावा, जवाहर नवोदय विद्यालय ते नकाणे नाल्यावर फरशी पुल मंजुर करावा, जामफळ, कनोली प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना मोबदला द्यावा. जैविक खतांच्या नावाने होणारी शेतकर्यांची फसवणूक थांबवावी आदी मागण्यांसाठी हे उपोषण केले जात असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार

0 Comments